अणवस्त्र वापराबाबत ट्रम्पवर विश्वास नाही - हिलरी
By Admin | Updated: July 29, 2016 12:09 IST2016-07-29T12:09:58+5:302016-07-29T12:09:58+5:30
डेमोक्रॅटीक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी गुरुवारी रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

अणवस्त्र वापराबाबत ट्रम्पवर विश्वास नाही - हिलरी
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २९ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रॅटीक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी गुरुवारी रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अमेरिकन जनतेसमोर सध्या अनेक आव्हाने असून अशा परिस्थिती अमेरिकेला स्थिर आणि सर्वांना एकत्र पुढे घेऊन जाणा-या नेतृत्वाची गरज आहे.
आपल्या भाषणात हिलरी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा आपण उजवे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. हिलरी यांनी आठ नोव्हेंबरला होणा-या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटीक पक्षाची उमेदवारी स्वीकारली.
सर्वांसाठी काम करणारा देश अशी आपण अमेरिकेची ओळख निर्माण करु असे हिलरी यांनी यावेळी सांगितले. ट्रम्पला आपल्याला जगापासून तोडायचे आहे,आपल्यात विभागणी करायची आहे. अणवस्त्रांच्या बाबतीतही आपण ट्रम्पवर विश्वास ठेऊ शकत नाही असे हिलरी म्हणाल्या.