महिला डॉक्टर नग्न होऊन करतेय रुग्णाचा उपचार
By Admin | Updated: October 18, 2016 18:02 IST2016-10-18T18:01:01+5:302016-10-18T18:02:12+5:30
न्युयॉर्कमध्ये एक महिला मानसोपचार तज्ञ पुरुष रुग्णांवर चक्क नग्न होऊन उपचार करत आहे.

महिला डॉक्टर नग्न होऊन करतेय रुग्णाचा उपचार
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. १८ - न्युयॉर्कमध्ये एक महिला मानसोपचार तज्ञ पुरुष रुग्णांवर चक्क नग्न होऊन उपचार करत आहे. नॉर्मली आपण रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरास अॅपरॉन घालून उपचार करत असल्यालं पाहतो. पण या महिला डॉक्टरनं रुग्णावर उपचार करण्यसाठी हा वेगळाच फंडा वापरला आहे. त्या महिला डॉक्टरचे नाव सराह असं नाव आहे. सध्या ती २४ वर्षाची आहे. ही घटना सोशल मिडियात वा-यासारखी व्हायरल झाली आहे.
यावर स्पष्टीकरण देताना सराह सांगते की, महान चिकित्सक फ्रायड यांच्या थेअरीनुसार मी उपचार करत आहे. व्हाइट पुरुष रूग्णांवर उपचार करण्यासाठी न्यूड थेरपीचा वापर करते आहे. नग्न होऊन रुग्णावर उपचार केल्यास पुरुषंच्या मनातील दबलेल्या लैंगिक इच्छेला बाहेर काढण्यात मदत होते. तसेच रुग्णांसोबत एक जवळीक निर्माण होते. ज्यामुळे रुग्ण खुलेपणाने त्यांच्या मनातील गोष्टी व्यक्त करतात
दरम्यान, ही चिकित्सा ती ऑनलाईन करते आहे. वेबकॅमच्या माध्यमातून ती रुग्णांवर उपचार करते. रूग्णांना ही थेरपी चांगलीच पसंत येत आहे. सराह एका सेशनसाठी ७००० रूपये इतकी फी घेत आहे.