मिथून चक्रवर्तींवर अमेरिकेत उपचार
By Admin | Updated: October 13, 2016 17:44 IST2016-10-13T16:22:39+5:302016-10-13T17:44:31+5:30
बॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेते मिथून चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अमेरिकेतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मिथून चक्रवर्तींवर अमेरिकेत उपचार
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथून चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अमेरिकेतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 66 वर्षीय मिथून यांना पाठदुखीचा त्रास असल्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2009 साली इमरान खान आणि श्रुती हासन स्टारर 'लक' फिल्म चित्रपटाच्यावेळी एका अॅक्शन सीन करताना त्यांच्या पाठीला मार लागला होता. ती दुखापत आता अधिक बळावली आहे.
डिस्को डान्सर म्हणून ओळखले जाणारे मिथून लक चित्रपटानंतर मोठ्या पडद्यापासून काहीसे दूर होते. गेल्या वर्षी छोट्या पडद्यावर एका शो चे परीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. पण सध्या ते अमेरिकामध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितला आहे.