शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अंतराळात अडकलेले चौघे पृथ्वीवर सुखरुप परतले; सुनिता विल्यम्स का येऊ शकत नाहीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 20:42 IST

आठ महिन्यांपासून अंतराळात अडकलेले चार अंतराळवीर सुखरुप पृथ्वीवर परतले आहेत.

Sunita Williams : गेल्या आठ महिन्यांपासून अंतराळात अडकलेले 4 अंतराळवीर आज अखेर पृथ्वीवर सुखरूप परतले. या चौघांना घेऊन येणाऱ्या यानाने समुद्रात फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ यशस्वी लँडिंग केली. पण, दुसरीकडे भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अद्याप पृथ्वीवर परतू शकल्या नाहीत. यानात झालेल्या बिघाडामुळे जुलै महिन्यापासून त्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये अडकून आहेत. 

दरम्यान, आज पृथ्वीवर परतलेल्या अतराळवीरांमध्ये तीन अमेरिकन आणि एका रशियन अंतराळवीरचा समावेश आहे. हे चौघे दोन महिन्यांपूर्वी पृथ्वीवर परतणार होते, मात्र त्यांच्या बोइंग 'स्टारलाइनर स्पेस कॅप्सूल'मध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांच्या परतीला उशीर झाला. सुरक्षेच्या कारणास्तव 'स्टारलाइनर स्पेस कॅप्सूल' रिकामे पृथ्वीवर परतले. यानंतर, खराब समुद्र परिस्थिती आणि मिल्टन चक्रीवादळामुळे आलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे त्यांच्या परतीला दोन आठवडे उशीर झाला. आता अखेर ते चौघे पृथ्तीवर सुखरुप परतले आहेत.

सुनीता विल्यम्स अजून परत येऊ शकल्या नाहीतसुनीता विल्यम्स आणि 'टेस्ट पायलट' बुच विल्मोर या दोन स्टारलाइन अंतराळवीरांचे मिशन आठ दिवसांवरुन आठ महिन्यांपर्यंत वाढले आहे. यानातील तांत्रिक बिघाडामुळे हे दोघे आजतागायत पृथ्वीवर परत येऊ शकले नाही. SpaceX ने चार आठवड्यांपूर्वी आणखी दोन अंतराळवीरांना वर पाठवले, ते सर्व फेब्रुवारीपर्यंत तिथेच राहतील. स्पेस स्टेशनमध्ये आता सात क्रू सदस्य आहेत, ज्यात चार अमेरिकन आणि तीन रशियन अंतराळवीरांचा समावेश आहे. दरम्यान सुनीता विल्यम्स कधी परतणार, हे अद्याप ठरलेले नाही.

टॅग्स :AmericaअमेरिकाNASAनासा