ऑस्ट्रेलियात पोपटाला वाचवण्यासाठी ट्रेन थांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2016 10:01 IST2016-03-25T10:01:13+5:302016-03-25T10:01:40+5:30

रेल्वे ट्रॅकवर आलेल्या पोपटाचा जीव वाचवण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये चक्क ट्रेन थांबवण्यात आली

The train stopped in Australia to save the Papalaya | ऑस्ट्रेलियात पोपटाला वाचवण्यासाठी ट्रेन थांबवली

ऑस्ट्रेलियात पोपटाला वाचवण्यासाठी ट्रेन थांबवली

>ऑनलाइन लोकमत - 
सिडनी, दि. २५ - रेल्वे ट्रॅकवर आलेल्या पोपटाचा जीव वाचवण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये चक्क ट्रेन थांबवण्यात आली. हा पोपट पाळीव असून रेल्वे ट्रॅकवर जाऊन बसला होता. समोरुन जलदगतीने ट्रेन येत होती त्यामुळे ट्रेनखाली येऊन त्याचा मृत्यू झाला असता. पोपटाला पाळणा-या चिमुरडीने लगेच स्टेशन मास्तरकडे धाव घेतली आणि ट्रेन थांबवण्याची विनंती केली. लहान मुलीने केलेली विनंती पाहून स्टेशन अधिका-यानेदेखील ट्रेन थांबवण्याचे आदेश दिला आणि पोपटाचा जीव वाचवला. 
 

Web Title: The train stopped in Australia to save the Papalaya