कॅमरुनमध्ये ट्रेन अपघात, 53 प्रवाशांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2016 02:57 IST2016-10-22T02:39:00+5:302016-10-22T02:57:05+5:30
कॅमेरुनमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात ५३ जणांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत.

कॅमरुनमध्ये ट्रेन अपघात, 53 प्रवाशांचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
कॅमरुन, दि. 22 - कॅमेरुनमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात ५३ जणांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅमेरुनची राजधानी याऔंडे शहरापासून १२० किलोमीटर अंतरावर इंटरसिटी पॅसेंजर या ट्रेनचा अपघात घडला. याऔंडे येथून आर्थिक राजधानी असलेल्या दौउला शहराकडे जात असताना ईसेका स्टेशनजवळ इंटरसिटी पॅसेंजर ट्रेनचा रुळावरुन घसरुन अपघात झाला. या अपघातात ५३ जणांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत.
ही घटना येथील स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून रेस्कू ऑपरेशन सुरु आहे. तसेच, जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.