Torrential rains in Dubai; Water also entered the mall | दुबईत मुसळधार पाऊस; मॉलमध्येही शिरले पाणी

दुबईत मुसळधार पाऊस; मॉलमध्येही शिरले पाणी

दुबई : दुबईमध्ये गेल्या काही तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने अनेक भागात प्रचंड पाणी साचले आहे. दुबईमधील हा पाऊस सोमवारपर्यंत राहील, असा अंदाज वर्तिवण्यात येत आहे. दुबईमधील अनेक मॉलच्या परिसरात आणि काही
मॉलमध्येही पाणी भरले गेले आहे. त्यामुळे येथून बाहेर पडणे अवघड झाले आहे. एका मॉलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, पावसामुळे मॉल परिसरात पाणी साचले असून ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येत आहे. सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि छायाचित्रातून असे दिसत आहे की, मुसळधार पावसाने रस्त्यांवर पाणीच पाणी साचले आहे. सखल भागातील दुकानांमध्येही पाणी साचले आहे. या दुकानांमधील कर्मचारी वस्तू सुरिक्षत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यूएईत केलेल्या क्लाउड सिडिंगमुळे (कृत्रिम पाऊस) पावसाचे प्रमाण वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Torrential rains in Dubai; Water also entered the mall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.