शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानमध्ये अज्ञात धुरंधर; अजहरचा उजवा हात मौलाना सलमानचा रस्ते अपघातात मृत्यू, वाहनासह चालक गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 13:51 IST

पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हत्येचे सत्र सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे.

Salman Azhar Killed in Pakistan: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूरमध्ये एका भीषण आणि रहस्यमय रस्ते अपघातात जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मौलाना सलमान अजहर ठार झाला आहे. एका अज्ञात भरधाव वाहनाने त्याला जोरदार धडक दिली आणि चालक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेने जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयात खळबळ उडाली असून, याला गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या टार्गेट किलिंगचा भाग मानले जात आहे.

जैशचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बहावलपूरमध्ये सलमान अजहर रस्त्यावरून जात असताना एका अज्ञात वाहनाने त्याला चिरडले. पाकिस्तानी यंत्रणा याला सामान्य अपघात भासवण्याचा प्रयत्न करत असल्या तरी, ज्या पद्धतीने हा अपघात झाला आणि वाहन गायब झाले, त्यावरून ही एक सुनियोजितपणे केलेली हत्या असल्याचे बोलले जात आहे.

कोण होता मौलाना सलमान अजहर?

सलमान अजहर हा केवळ एक कमांडर नव्हता, तर तो जैशचा महत्त्वाचा भाग मानला जात असे. तो वैश्विक दहशतवादी मसूद अजहरच्या अत्यंत जवळचा होता. संघटनेचे सर्व मोठे निर्णय त्याच्या सल्ल्याने घेतले जात. भारतात दहशतवादी हल्ल्यांचे कट रचणे, नवीन तरुणांची भरती करणे आणि दहशतवादासाठी निधी गोळा करण्यात त्याची मुख्य भूमिका होती. त्याच्या मृत्यूमुळे जैशच्या अंतर्गत रचनेला मोठा धक्का बसला आहे.

पाकिस्तानात दहशतवाद्यांची रांग लागली

गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या भारतविरोधी दहशतवाद्यांचा एकामागून एक काटा काढला जात आहे. ही मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. जून २०२५ मध्ये जैशचा बडा कमांडर मौलाना अब्दुल अजीज इसार रहस्यमय स्थितीत मृत आढळला होता. २६ एप्रिल रोजी लष्कर-ए-तोयबाचा शेख युसूफ अफ्रिदी हा अज्ञात बंदूकधाऱ्यांच्या गोळीबारात ठार झाला. अमीर हमजा या लष्कर-ए-तोयबाच्या या संस्थापकावर लाहौरमध्ये जीवघेणा हल्ला झाला, ज्यात तो गंभीर जखमी झाला.

२०२३ पासून सुरू झालेला हा पॅटर्न २०२६ मध्येही तितक्याच वेगाने सुरू आहे. कधी अज्ञात बंदूकधारी जवळून गोळ्या झाडतात, तर कधी संशयास्पद रस्ते अपघात घडवून आणले जातात. महत्त्वाचे म्हणजे, बहावलपूरसारख्या महत्त्वाच्या भागात ही घटना घडल्याने पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jaish-e-Mohammed commander Maulana Salman Azhar killed in Pakistan accident.

Web Summary : Jaish-e-Mohammed commander Maulana Salman Azhar died in a suspicious road accident in Pakistan. An unidentified vehicle hit him; the driver fled. This incident raises concerns about targeted killings of anti-India terrorists in Pakistan.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानterroristदहशतवादी