Mossad Spy in Iran Strike: एका अत्यंत गुप्त आणि धाडसी संयुक्त कारवाईत अमेरिका आणि इस्रायलनेइराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामनेई यांचा खात्मा केला. शनिवारी झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली असून, इस्रायली गुप्तहेर संस्था मोसादने खामनेईंचा अचूक ठावठिकाणा कसा शोधला, यावरून आता अनेक थक्क करणारे दावे समोर येत आहेत.
नेत्यांच्या दात आणि पोटात ट्रॅकिंग चिप्स?
सोशल मीडियावर सध्या ऑपरेशन टूथ फेअरी या नावाची जोरदार चर्चा आहे. एका दाव्यानुसार, मोसादच्या एजंट्सनी इराणमध्ये डॉक्टर आणि डेंटिस्ट म्हणून शिरकाव केला होता. त्यांनी इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या दातांवर उपचार करताना त्यात सूक्ष्म ट्रॅकिंग चिप्स बसवल्या. इतकेच नाही तर काही गॅस्ट्रो डॉक्टरांनी रुग्णांच्या पोटातही अशाच प्रकारची उपकरणे पेरल्याची चर्चा आहे. जरी याला अधिकृत दुजोरा मिळालेला नसला, तरी मोसादच्या कार्यपद्धतीमुळे या वाईल्ड थिअरीला लोक खरे मानत आहेत.
इराणच्या इनर सर्कलमध्ये मोसादचा सुरुंग
खामनेईंच्या सुरक्षिततेचे कवच भेदणे सोपे नव्हते. मात्र, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्समधील उच्चपदस्थ अधिकारी इस्माईल कानी हेच इस्रायलचे खबरी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अहवालांनुसार, हल्ल्याच्या काही वेळ आधी कानी हे खामनेईंच्या निवासस्थानी होते आणि हल्ला होण्यापूर्वीच तेथून सुरक्षित बाहेर पडले. यावरून इराणच्या सर्वोच्च वर्तुळात मोसादने हेर पेरल्याचे स्पष्ट होत आहे.
ट्रॅफिक कॅमेऱ्यांचे हॅकिंग
आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे की, इस्रायलने गेल्या अनेक वर्षांपासून इराणमधील ट्रॅफिक कॅमेरे हॅक केले होते. तेहरानमधील जवळपास सर्वच कॅमेऱ्यांचा ताबा इस्रायलकडे होता. या कॅमेऱ्यांचे फुटेज थेट तेल अवीवमधील सर्व्हरवर पाठवले जात होते, ज्यातून खामनेईंच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात होती.
डोनाल्ड ट्रम्प आणि नेतन्याहू यांचे मोठे विधान
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईची पुष्टी करताना खामनेईंना जगातील सर्वात दुष्ट व्यक्ती असे म्हटले. इराणला अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची असल्याचे ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे.
इराणमध्ये मोसादचे जाळे किती खोल?
मोसादने इराणमध्ये शेकडो स्थानिक एजंट्सना कोट्यवधी डॉलर्स देऊन आपल्या जाळ्यात ओढले आहे. यात शास्त्रज्ञ, लष्करी अधिकारी आणि अगदी सामान्य नागरिकांचाही समावेश आहे. इराणच्या हद्दीतच ड्रोन आणि क्षेपणास्त्रे तस्करी करून गुप्त ठिकाणी साठवण्यात आली होती, ज्याचा वापर या हल्ल्यात झाला. २०२५ पासूनच मोसादने इराणच्या एअर डिफेन्स सिस्टिमला खिळखिळे करण्यास सुरुवात केली होती.
Web Summary : Reportedly, Mossad agents infiltrated Iran as doctors, implanting tracking chips in leaders' teeth and stomachs. Israel allegedly hacked Iranian traffic cameras, monitoring Khamenei's movements. The operation, confirmed by Trump and Netanyahu, aimed to prevent Iran from acquiring nuclear weapons. Local agents aided the mission.
Web Summary : खबर है कि मोसाद एजेंटों ने डॉक्टरों के रूप में ईरान में घुसपैठ की, नेताओं के दांतों और पेट में ट्रैकिंग चिप्स लगाए। इस्राइल ने कथित तौर पर ईरानी ट्रैफिक कैमरों को हैक कर खामेनेई की गतिविधियों की निगरानी की। ट्रम्प और नेतन्याहू द्वारा पुष्टि की गई, ऑपरेशन का उद्देश्य ईरान को परमाणु हथियार प्राप्त करने से रोकना था। स्थानीय एजेंटों ने मिशन में सहायता की।