Tokyo Rains: जपानमध्ये अचानक झालेल्या पावसाने राजधानी टोक्योतील जनजीवन कोलमडले आहे. टोक्याला लागून असलेल्या काही प्रांतामध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक भागात घरांमध्ये पाणी शिरले. अनेक ठिकाणी नाल्यांना नद्याचे रुप आले. टोक्यो आणि शेजारी महत्त्वाच्या शहरातील व्हिडीओ समोर आले आहेत.
तासभरातच टोक्यो आणि इतर जवळच्या काही भागात तासाभरातच ११० मिमी पाऊस पडला. पावसाबरोबर वादळी वारे असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले.
अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने टोक्यो आणि काही शहरांमध्ये एमर्जन्सी अलर्ट जारी करण्यात आला आहे. टोक्यो, सुगनामी, नेरिमा, शिंजूकू या शहरांतही पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली.
जपानच्या हवामान विभागाने पुढील काही दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही भागात ढगफुटी, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, पूर, भूस्खलन, गारपीट होण्याची शक्यता असून, खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने प्रशासनाला केले आहे.