शहरं
Join us  
Trending Stories
1
शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २३ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ...
2
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
3
दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो
4
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
5
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
6
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
7
धक्कादायक... मेळघाटात व्यसनामुळे वाढतोय कॅन्सर; युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये रक्ताल्पता : संशोधन चमू काढणार निष्कर्ष
8
क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?
9
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
10
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
11
घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
12
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
13
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
14
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
15
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
16
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
17
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
18
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
19
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
20
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
Daily Top 2Weekly Top 5

आजचा दिन लोकशाहीचा, एकजूट होऊ या...; अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 06:58 IST

जनतेच्या महत्त्व अधोरेखित करताना बायडेन म्हणाले, अमेरिकेचे ऐक्य आणि जनतेच्या एकजुटीसाठी मी आज जानेवारी या दिनी समर्पित आहे, असे सांगत त्यांनी द्वेष, मत्सर, कट्टरता, कायदाभंग, हिंसाचार, बेरोजगारी, अनारोग्य आणि निराशेविरुद्ध लढा देण्यासाठी एकजूट व्हावे लागेल.

वॉशिंग्टन : ‘आजचा दिन अमेरिकेचा, लोकशाहीचा आहे. इतिहास आणि आशेचा दिन. आपण आज एका उमेदवाराचा विजय नव्हे तर एका उद्देशाचा, लोकशाहीच्या उद्देशाचा विजय साजरा करीत आहोत. लोकशाही जिंकली. सर्व अमेरिकी जनतेचा मी राष्ट्राध्यक्ष असेन. श्वेत वर्णीयांच्या वर्चस्ववादाचा आणि देशांतर्गत दहशतवादाला आम्ही पराभूत करू. यासाठी प्रत्येक अमेरिकन व्यक्तीने मला साथ द्यावी, असे आवाहन करीत महाशक्तिशाली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी राष्ट्रीय ऐक्य अबाधित राखण्याची आणि एकजूट होण्याची साद घातली.जनतेच्या महत्त्व अधोरेखित करताना बायडेन म्हणाले, अमेरिकेचे ऐक्य आणि जनतेच्या एकजुटीसाठी मी आज जानेवारी या दिनी समर्पित आहे, असे सांगत त्यांनी द्वेष, मत्सर, कट्टरता, कायदाभंग, हिंसाचार, बेरोजगारी, अनारोग्य आणि निराशेविरुद्ध लढा देण्यासाठी एकजूट व्हावे लागेल.आपला इतिहास सातत्याने अमेरिका आदर्शादरम्यान संघर्ष करीत आला आहे. वंशवाद, उपजतवाद, भीती आणि असुरीपणाने आमच्यात दरी निर्माण केली जात आहे. दोन आठवड्यांपूर्वी कॅपिटलमध्ये हिंसक प्रकार घडल्याने शपथविधी समारोहासाठी कडेकोट सुरक्षा करण्यात आली होती. सरन्यायाधीश जॉन रॉबर्टस्‌ यांनी बायडेन यांना राष्ट्राध्यक्षपदाची शपथ दिली. 

बायडेन यांच्या शपथविधीआधी कमला हॅरिस यांचा उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी पार पडला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश सोनिया सॉटोमायर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून इतिहास घडविला. त्या पहिल्या कृष्णवर्णीय आणि पहिल्या भारतीय-अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष आहेत.

आव्हानांचा यशस्वी मुकाबला -राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्राला उद्देशून केलेल्या पहिल्याच भाषणात बायडेन म्हणाले की, अमेरिका वारंवार कसोट्यांना सामोरे गेली. सर्व आव्हानांचा यशस्वीपणे मुकाबला करीत अमेरिका वाटचाल करीत आहे. काही शक्ती आमच्यात फूट पाडत आहेत. या शक्ती काही नवीन नाहीत.  

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाUSअमेरिकाUnited Statesअमेरिका