कॅनडात तीन कैदी हेलिकॉप्टरने फरार

By Admin | Updated: June 9, 2014 05:32 IST2014-06-09T05:32:23+5:302014-06-09T05:32:23+5:30

कॅनडाच्या एका कारागृहातील तीन कैदी हेलिकॉप्टरच्या मदतीने फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Three prisoner helicopters absconded in Canada | कॅनडात तीन कैदी हेलिकॉप्टरने फरार

कॅनडात तीन कैदी हेलिकॉप्टरने फरार

मॉन्ट्रियल : कॅनडाच्या एका कारागृहातील तीन कैदी हेलिकॉप्टरच्या मदतीने फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
क्युबेक प्रांतातील ओरसेनविले कारागृहात शनिवारी ही घटना घडली. पोलीस आता या तिन्ही कैद्यांचा शोध घेत आहेत. यवेस डेनिस, डेनिस लेफेबवरे आणि सर्गे पोमेरलियु अशी या कैद्यांची नावे आहेत.
या तिघांना फरार होण्यास मदत करणारे हेलिकॉप्टर पश्चिमेकडे गेल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
 

Web Title: Three prisoner helicopters absconded in Canada