इसिसच्या ताब्यातील ३ तेल प्रकल्प हल्ल्यात नष्ट

By Admin | Updated: September 29, 2014 05:57 IST2014-09-29T05:57:00+5:302014-09-29T05:57:00+5:30

अमेरिकेच्या नेतृत्वाखाली जागतिक फौजांनी केलेल्या हवाई हल्ल्यात इस्लामिक स्टेटच्या कब्जातील सिरियातील ३ हंगामी तेल प्रकल्प नष्ट झाले

Three oil plants in the custody of Isis destroyed in the attack | इसिसच्या ताब्यातील ३ तेल प्रकल्प हल्ल्यात नष्ट

इसिसच्या ताब्यातील ३ तेल प्रकल्प हल्ल्यात नष्ट

बैरुत : अमेरिकेच्या नेतृत्वाखाली जागतिक फौजांनी केलेल्या हवाई हल्ल्यात इस्लामिक स्टेटच्या कब्जातील सिरियातील ३ हंगामी तेल प्रकल्प नष्ट झाले. संघटनेच्या आर्थिक नाड्या आवळण्याच्या उद्देशातहत या तेल प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आले.
तुर्कीच्या सीमेलगतच्या ताल अबयाद भागानजीक जागतिक आघाडीच्या फौजांनी नेम साधून हवाई हल्ला केला, असे सिरियन आॅर्ब्झव्हेटरी फॉर ह्युमन राईट्सच निरीक्षकांनी सांगितले. (वृत्तसंस्था)




 

 

Web Title: Three oil plants in the custody of Isis destroyed in the attack