तीन भावांनी आपापल्या पत्नींना एकाचवेळी दिला घटस्फोट, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 03:43 PM2022-02-21T15:43:16+5:302022-02-21T15:43:43+5:30

Three brothers divorce wives for neglecting mother : तिन्ही भावांच्या पत्नींनी त्यांच्या आजारी वृद्ध आईची काळजी घेतली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Three brothers divorce wives simultaneously for not taking care of mother-in-law | तीन भावांनी आपापल्या पत्नींना एकाचवेळी दिला घटस्फोट, कारण...

तीन भावांनी आपापल्या पत्नींना एकाचवेळी दिला घटस्फोट, कारण...

googlenewsNext

अल्जेरियामध्ये तीन भावांनी आपापल्या पत्नींना एकाचवेळी घटस्फोट दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा घटस्फोटाचा निर्णय काही महिन्यांत घेतला नाही, तर या तिघांनी एका मिनिटात विचारविनिमय करून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, तिन्ही भावांच्या पत्नींनी त्यांच्या आजारी वृद्ध आईची काळजी घेतली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

गल्फ न्यूजच्या रिपोर्टनुसार, महिलांनी आपल्या सासूची काळजी घेतली नाही आणि तिच्या खाण्यापिण्याचीही काळजी घेतली नाही. रिपोर्टनुसार, ही घटना घडली जेव्हा तिघे भाऊ कामावरून घरी पोहोचले, तेव्हा त्यांनी शेजारील एका महिलेला आपल्या आजारी वृद्ध आईला आंघोळ घालताना पाहिले. त्यावेळी त्यांच्या तिन्ही बायका तेथून बेपत्ता होत्या. हे पाहून तिन्ही भावांना खूप राग आला आणि त्यांनी आपापल्या पत्नींना बोलावून घेतले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटात तिघांनीही आपापल्या पत्नींना घटस्फोट दिला. 

रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, वृद्ध महिलेची काळजी तिची मुलगी घेत होती. मुलगी आठवड्यातून दोनदा तिला भेटायला जायची आणि जेवण देत होती. तसेच, आंघोळ घालत होती. मात्र याच दरम्यान तिच्या पतीला कॅन्सर झाला, त्यानंतर ती आपल्या आईकडे येऊ शकली नाही. मुलीच्या अनुपस्थितीमुळे वृद्ध महिलेच्या अडचणी आणखी वाढल्या. जोपर्यंत बहीण येत नाही तोपर्यंत आईची काळजी घ्या, असे तिन्ही मुलांनी आपापल्या पत्नींना सांगितले होते. पण त्या तिघींनी आपल्या सासूची काळजी घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर एके दिवशी तिन्ही भावांनी आपापल्या पत्नींना घटस्फोट दिल्याचे सांगितले जात आहे. 

Web Title: Three brothers divorce wives simultaneously for not taking care of mother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.