अमेरिकेतील एका घरात आढळले तीन मृतदेह

By Admin | Updated: September 25, 2016 02:49 IST2016-09-25T02:49:50+5:302016-09-25T02:49:50+5:30

अमेरिकेतील फुलेरटॉन शहरातील एका घरात दोन पुरुष आणि एका महिलेचा मृतदेह येथील पोलिसांना आढळला.

Three bodies found in a US house | अमेरिकेतील एका घरात आढळले तीन मृतदेह

अमेरिकेतील एका घरात आढळले तीन मृतदेह

ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. 25 - अमेरिकेतील फुलेरटॉन शहरातील एका घरात दोन पुरुष आणि एका महिलेचा मृतदेह येथील पोलिसांना आढळला.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय प्रमाणवेळ शनिवारी रात्री १०  वाजताच्या सुमारास येथील पोलिसांना एका मुलाचा फोन आला. त्या मुलाने पोलिसांना असे सांगितले की, माझा वडीलांचा मृत्यू झाला आहे.  त्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले असता ही घटना उघडकीस आली. तसेच, या घरातील दोन अल्पवयीन मुलेही सुखरुप असल्याचे आढळून आले.

Web Title: Three bodies found in a US house