शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

धक्कादायक! खात्यात अचानक 3 अब्ज रुपये आल्यानं रिक्षाचालक बेशुद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 8:07 AM

बँकेत गेला, तेव्हा त्याच्या खात्यात 3 अब्ज रुपये असल्याचं समजलं आणि तो बेशुद्धच पडला.

इस्लामाबाद- पाकिस्तानमधील रिक्षाचालकाबरोबर एक बाका प्रसंग घडला आहे. मोहम्मद रशीदला स्वतःच्या मुलीला सायकल विकत घेऊन द्यायची होती. त्यासाठी त्यानं रिक्षा चालवत असतानाच मुलीसाठी म्हणून वर्षभरात 300 रुपये वेगळे जमवले होते. परंतु तो जेव्हा बँकेत गेला, तेव्हा त्याच्या खात्यात 3 अब्ज रुपये असल्याचं समजलं आणि तो बेशुद्धच पडला. एवढी मोठी रक्कम आपल्या खात्यात कुठून आली या प्रश्नानं तो चक्रावून गेला. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मनी लाँड्रिंगविरोधात कडक पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं होतं, त्याचीही आठवण रशीद याला झाली. त्यानंतर फेडरल तपास यंत्रणेचा त्याला फोन आला, त्यावेळी तो हा सगळा प्रकार लपवू इच्छित होता. परंतु त्यांच्या कुटुंबीयांनी अधिका-यांना सहकार्य करण्याची त्याला सूचना केली. गेल्या काही दिवसांपूर्वीही असाच एक प्रकार पाकिस्तानात समोर आला होता. एका गरीब व्यक्तीच्या खात्यामध्ये अचानक पैसे आले होते आणि त्याला मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात देश सोडावा लागला.मोहम्मद रशीद म्हणाले, मी घाबरून रिक्षा चालवणं बंद केलं आहे. या प्रकारानंतर माझ्या पत्नीचंही स्वास्थ्य बिघडलं. खरं तर रशीदची निर्दोष म्हणून सुटका करण्यात आली आहे, तरीही त्याचं टेन्शन काही कमी झालेलं नाही. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा फार वाईट काळ सुरू आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी इम्रान खान यांनी मनी लाँड्रिंगअंतर्गत देशाबाहेर जाणारा पैसा परत आणण्याचा संकल्प केला आहे.