ब्रसेल्स हल्ल्याप्रकरणी अजून तिघांना अटक
By Admin | Updated: March 28, 2016 15:56 IST2016-03-28T15:56:46+5:302016-03-28T15:56:46+5:30
दहशतवादी हल्ला प्रकरणी पोलिसांचं धाडसत्र सुरु असून अजून तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे

ब्रसेल्स हल्ल्याप्रकरणी अजून तिघांना अटक
>
ऑनलाइन लोकमत -
ब्रसेल्स, दि. 28 - दहशतवादी हल्ला प्रकरणी पोलिसांचं धाडसत्र सुरु असून अजून तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे. दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप या तिघांवर ठेवण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे यासिन, मोहम्मद आणि अबुबकेर अशी आहेत. त्यांच्याबद्द्ल अजून माहिती देण्या अधिका-यांनी नकार दिला आहे. या तिघांनी अटक करण्यात आली असून चौकशी सुरु आहे.
पोलिसांनी अजून एका व्यक्तीला अटक केली होती मात्र चौकशी करुन त्याला सोडून देण्यात आलं आहे. पोलिसांचं धाडसत्र सुरुच असून रविवारी 13 ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडींमध्ये या 4 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिका-यांनी दिली होती. दरम्यान बेल्जिअम अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ल्यात जखमी झालेल्या 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढला असून 35 वर पोहोचला आहे.