शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
3
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
4
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
5
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
6
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
7
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
8
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
9
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
10
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
11
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
12
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
13
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
14
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
15
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
16
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
17
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
19
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
20
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला

इसिसमुळे दुर्मिळ पक्ष्याचे अस्तित्व धोक्यात

By admin | Published: May 26, 2015 1:47 AM

मध्य-पूर्वेतील सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाची स्थळे एका मागोमाग ताब्यात घेणाऱ्या इसिसमुळे एका दुर्मिळ पक्ष्याचे अस्तित्वही धोक्यात आले आहे.

दमास्कस : मध्य-पूर्वेतील सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाची स्थळे एका मागोमाग ताब्यात घेणाऱ्या इसिसमुळे एका दुर्मिळ पक्ष्याचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. पामिरा हे सिरियामधील प्राचीन शहर इसिसने ताब्यात घेतल्यानंतर तेथे असणारी नॉदर्न बाल्ड इबिस या पक्ष्यांची अखेरची, उरलीसुरली वसाहत नष्ट होण्याची भीती तज्ज्ञ बोलून दाखवत आहेत. इसिसने गेल्याच आठवड्यामध्ये या शहराचा ताबा घेतल्यावर तेथील तीन पक्षी परागंदा झाल्याची नोंद करण्यात आली आहे. २००२ साली येथे त्यांचे प्रजनन स्थान आढळल्यावर त्यांचे संरक्षण सुरु झाले आहे. इबिस बाल्ड काळ््या रंगाचा आकाराने मोठा पक्षी असून त्याची चोचही लांब असते. एकेकाळी मध्य पूर्व, उत्तर अफ्रिका, मध्य युरोपात आढळणारा हा पक्षी आता हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच संख्येने उरला आहे. नामशेष होण्याच्या मार्गावरील या पक्ष्यांच्या प्रजातीला दहशतवादी आक्रमणाची झळ बसली आहे. २००२ साली असे चार पक्षी पामिरा शहराजवळ सापडले होते. यातील तीन पक्षी गेल्या आठवड्यापासून एकाकी पडले आहेत. त्यांचे रक्षण करणारे रक्षक लढाई सुरू होताच पळून गेले. या पक्ष्यांचे भवितव्य अंधारात आहे. या पक्ष्यांपैकी चौथी पक्षीणही बेपत्ता असून तिच्या शोधासाठी १ हजार डॉलरचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तिचे नाव झिनोबिया असे आहे. लेबनॉनमधील निसर्ग संरक्षण संस्थेच्या मते झिनोबिया ही पक्षीण सापडणे फार महत्त्वाचे आहे. कारण याच पक्षिणीला हिवाळ्यात इथियोपियाला जाण्याचे मार्ग माहीत आहेत. तिच्याशिवाय राहिलेल्या तीन पक्ष्यांना बाहेर सोडता येणार नाही. झिनोबिया नसताना या तीन पक्ष्यांना सोडल्यास ते जंगलात हरवतील व सिरियातून हा पक्षी नष्ट होईल. बाल्ड इबिस हा स्थलांतर करणारा पक्षी आहे. तो वाळवंट, खडकाळ भागात वाहत्या पाण्याजवळ आढळतो. हा दुर्मिळ पक्षी मध्यपूर्व, उत्तर आफ्रिका, दक्षिण व मध्य युरोप येथे आढळतो. त्याचे अवशेष १८ लाख वर्षांपूर्वीचे आहेत. युरोपमधून हा पक्षी ३०० वर्षांपूर्वी नाहीसा झाला असून आता अत्यंत दुर्मिळ समजला जातो. इसिसने पामिरा शहर ताब्यात घेतल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदाय चिंतित झाला आहे. पामिरा हे जागतिक वारसा असलेले शहर आहे. इस्लामिक स्टेटस्च्या जिहादींनी आधीच इराकमधील वास्तुशिल्पाचा खजिना असलेले निमरुद हे गाव नष्ट केले आहे.