इसिसने व्हिडिओद्वारे दिली व्हाइट हाऊस उडवण्याची धमकी
By Admin | Updated: November 20, 2015 13:06 IST2015-11-20T09:53:57+5:302015-11-20T13:06:52+5:30
इसिस या दहशतवादी संघटनेने आता एका व्हिडिओद्वारे 'व्हाईट हाऊस' उडवण्याची धमकी दिली आहे.
इसिसने व्हिडिओद्वारे दिली व्हाइट हाऊस उडवण्याची धमकी
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्ट, दि. २० - संपूर्ण जगाला हादरवणा-या पॅरिस हल्ल्याला कारणीभूत ठरलेल्या इसिस या दहशतवादी संघटनेने आता एका नव्या व्हिडिओद्वारे अमेरिकेती 'व्हाईट हाऊस' उडवण्याची धमकी दिली आहे. तसेच येत्या काही दिवसांतत पॅरिसमध्ये आणखी हल्ले घडवण्यात येतील, असेही या व्हिडीओत इसिसच्या दहशतवाद्याने म्हटले आहे.
पॅरिस हल्ल्यानंतर फ्रान्स व अमेरिकेने इसिसविरोधी मोहिम तीव्र करत सिरीयातील इसिसच्या तळावर जोरदार हल्ले चढवले, अमेरिकेने सैन्यानेही अनेक हल्ले केले. त्यामुळे खवळलेल्या इसिसने आता थेट अमेरिकेला लक्ष्य करण्याचा इशारा दिला आहे.
'पॅरिस बिफोर रोम' असे नाव या सहा मिनिटांच्या व्हिडीओला देण्यात आले असून आत्मघाती हल्लेखोर आणि कार बॉम्बस्फोटांच्या सहाय्याने व्हाईट हाऊस उडवून लावू, असे या व्हिडीओत म्हटले आहे.
सिरीयावर हवाई हल्ले करणा-या देशांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. फ्रान्सप्रमाणे आता अमेरिकेवरही हल्ले करण्यात येतील, अशी धमकी दहशतवाद्याने व्हिडीओद्वारे दिली आहे.