शहरं
Join us  
Trending Stories
1
Narayan Rane : 'मी एका उपशाखा प्रमुखाला ठार मारणार होतो, बाळासाहेब ठाकरेंनी मला समजावलं म्हणून...'; नारायण राणेंनी सांगितला किस्सा
2
ट्रंप यांनी जाहीर केली सरकारी मदत घेणाऱ्या देशांची लिस्ट; त्यात भारताचे तीन शेजारी, भारताचे नाव आहे का?
3
खळबळजनक! नायजेरियात २२ भारतीय खलाशांना बेड्या; मालवाहू जहाजावर कोकेन सापडले...
4
धक्कादायक! अमेरिकेत भारतीय तरुणीचा खून करून प्रियकर भारतात पसार; पोलिसांना भेटून आला...
5
वंदे भारत एक्सप्रेस रुळावरून घसरण्याचा कट! रुळांवर लाकूड ठेवल्याचे आढळले; मोठा अपघात टळला
6
"मला खुश करणं गरजेचं, अन्यथा..."; रशियन तेलावरून डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला पुन्हा टॅरिफचा इशारा
7
बँक कर्मचारी संपावर जाणार, तीन दिवस व्यवहार होणार ठप्प; कधी, कुठे अन् कसा परिणाम होईल?
8
धक्कादायक! ट्रंप यांची व्हेनेझुएलावर दुसऱ्या हल्ल्याची धमकी; आता कोलंबियाही रडारवर, दक्षिण अमेरिकेत युद्धाचे ढग?
9
भाजपविरोधात १०१, तर शिंदेसेनेच्या विरोधात ८३ ठिकाणी मनसे लढणार; मराठी मते कोणाला मिळणार?
10
आजचे राशीभविष्य ५ जानेवारी २०२६ :आज ग्रहांची चाल 'या' राशींसाठी ठरणार फलदायी; पाहा तुमचे राशीभविष्य!
11
‘बिनविरोध’ निवडीवरून राज्यात राजकीय रणकंदन; मुख्यमंत्री फडणवीस यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर
12
मुंबईत १० रुपयांत जेवण, ठाकरेंचा शब्द; महापालिका निवडणुकीसाठी वचननामा
13
“हिंदू आहोत, हिंदी नाही, इथल्या प्रत्येक शहरातील महापौर मराठीच होणार”: राज ठाकरे
14
“विधानसभा अध्यक्षांना निलंबित करावे”; पदाचा दुरुपयोग केल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप
15
“वचननामा नव्हे ‘वाचून’नामा”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे बंधूंवर खोचक टीका
16
“स्वतः विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेत, आधी उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”: आशिष शेलार
17
“उद्धव ठाकरे यांचा महापौर झाल्यास, मुंबईचे पाकिस्तान होईल”; अमित साटम यांनी केला प्रत्यारोप
18
राज्यातील प्रत्येक बसस्थानक-नगरपालिकेत पुस्तकांचे सवलतीत दुकान; DCM शिंदेंची साहित्य संमेलनात घोषणा
19
ठाण्यातून मराठी माणूस हद्दपार होतोय, मौनव्रत का? उद्धवसेनेचे नेते केदार दिघेंचा सवाल
20
बंडखोरी आटोक्यात; मात्र अपक्षांची डोकेदुखी कायम, ठाण्यात १३१ जागांसाठी ८६ अपक्ष रिंगणात
Daily Top 2Weekly Top 5

"हे ड्रग्जसाठी नाही तर तेलासाठी युद्ध!" व्हेनेझुएला कारवाईवरून कमला हॅरिस यांचा ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 11:11 IST

Kamala Harris Criticizes Donald Trump: व्हेनेझुएलातील कारवाईवर माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस संतापल्या. डोनाल्ड ट्रम्प केवळ तेलासाठी सैनिकांचे प्राण धोक्यात घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वाचा सविस्तर.

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलामध्ये केलेल्या लष्करी कारवाईवरून देशांतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे. अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला असून, "हे प्रकरण लोकशाही किंवा अमली पदार्थांच्या तस्करीचे नसून केवळ तेलासाठी पुकारलेले युद्ध आहे," असा गंभीर आरोप ट्रम्प यांच्यावर केला आहे.

हॅरिस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपली प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांच्या धोरणांवर कडाडून टीका केली. त्या म्हणाल्या, "ट्रम्प यांच्या या कृतीमुळे अमेरिका अधिक सुरक्षित किंवा मजबूत झालेली नाही. निकोलस मादुरो हे हुकूमशहा असले तरी, त्यांच्याविरुद्ध केलेली ही कारवाई बेकायदेशीर आणि अविचारी आहे. सत्तेसाठी किंवा तेलासाठी केलेली ही युद्धे शेवटी अराजकतेकडे नेतात आणि त्याची किंमत अमेरिकन कुटुंबांना मोजावी लागते."

कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांच्या दाव्यांना 'खोटेपणा' म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, जर ट्रम्प यांना खरोखरच लोकशाहीची काळजी असती, तर त्यांनी व्हेनेझुएलातील वैध विरोधी पक्षाला डावलून मादुरोच्या साथीदारांशी करार केले नसते. "ट्रम्प यांना केवळ प्रादेशिक शक्ती बनायचे आहे. त्यांनी अमली पदार्थांच्या तस्करांना माफी दिली आहे, मग आता ते ड्रग्जच्या विरोधात कारवाईचा आव का आणत आहेत?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सैनिकांचे प्राण धोक्यात घातल्याचा दावा लष्करी कारवाईमुळे अमेरिकन सैनिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचा आरोपही हॅरिस यांनी केला आहे. "राष्ट्राध्यक्ष कोणत्याही कायदेशीर अधिकाराशिवाय आणि ठोस 'एक्झिट प्लॅन'शिवाय अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत. यामुळे संपूर्ण क्षेत्र अस्थिर होईल आणि देशाला कोणताही फायदा होणार नाही," असे त्या म्हणाल्या. अमेरिकेला अशा नेतृत्वाची गरज आहे जे युद्धाऐवजी महागाई कमी करण्याला आणि कायद्याच्या राज्याला प्राधान्य देईल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kamala Harris Slams Trump's Venezuela Action: 'It's About Oil, Not Drugs'

Web Summary : Kamala Harris criticized Trump's Venezuela military action, calling it an oil grab disguised as a drug war. She argued it destabilizes the region, endangers troops, and benefits Maduro's allies over democracy, questioning Trump's motives and priorities.
टॅग्स :Kamala Harrisकमला हॅरिसDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प