चीनमध्ये १० पैकी सहा डॉक्टरांना होते शिवीगाळ
By Admin | Updated: May 28, 2015 23:52 IST2015-05-28T23:52:52+5:302015-05-28T23:52:52+5:30
चीनमध्ये १० पैकी जवळपास सहा डॉक्टरांना शिवीगाळीस सामोरे जावे लागते. ६४ टक्के डॉक्टरांना त्यांची पुढील पिढी या क्षेत्रात येऊ नये, असे वाटते.

चीनमध्ये १० पैकी सहा डॉक्टरांना होते शिवीगाळ
बीजिंग : चीनमध्ये १० पैकी जवळपास सहा डॉक्टरांना शिवीगाळीस सामोरे जावे लागते. ६४ टक्के डॉक्टरांना त्यांची पुढील पिढी या क्षेत्रात येऊ नये, असे वाटते.
चीनमधील मेडिकल डॉक्टर संघटनेच्या सर्वेक्षणानुसार, गेल्यावर्षी १२,६०० डॉक्टरांपैकी सुमारे १३.७ टक्क्यांना रुग्णांनी जखमी केले. रुग्णांच्या मारहाणीत काही डॉक्टरांचा मृत्यूही झाला आहे. डॉक्टर-रुग्ण यांच्यातील वादंगावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. शिन्हुआ वृत्तसंस्थेने सरकारी ‘पीपल्स डेली’द्वारे करण्यात आलेल्या सल्लामसलतीच्या हवाल्याने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. ३२.६९ टक्के डॉक्टर दर आठवड्यात ४० ऐवजी ६० तासांहून अधिक काम करतात.