शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

रशियात एकच छत्री आहे का?; राष्ट्रपती पुतीनवर जोक्सचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 11:27 IST

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना सोशल मीडियातून ट्रोल करण्यात येत आहे. फिफा विश्वचषकातील बक्षिस समारंभावेळी पुतीन यांच्या डोक्यावर छत्री दिसत आहे. त्यावरुन नेटीझन्सने पुतीन यांची मजा घेतल्याचे दिसून येते.

मॉस्को - फिफा विश्वचषक 2018 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रोमांचक लढत पाहायला मिळाली. रशियाच्या धरतीवर फ्रान्स आणि क्रोएशियन खेळाडूंचा थरार जगाने अनुभवला. या रोमहर्षक लढतीत 4-2 अशा फरकाने फ्रान्सने विजय मिळवला. या विजयानंतर फ्रान्स संघावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव झाला. फ्रान्स खेळाडूंनीही तितक्याच जल्लोषात विजयानंद साजरा केला. त्याचवेळी मैदानात चक्क वरुणराजानेही हजेरी लावत दोन्ही संघांचे अभिनंदन केले. तर, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी भर पावसात विजयी खेळाडू्ंना विश्वचषक सुपूर्द केला. मात्र, बक्षिस सोहळ्यात त्यांच्या डोक्यावरील छत्री सर्वांचे आकर्षण ठरली.

फिफा विश्वचषक 2018 स्पर्धेत तब्बल 20 वर्षानंतर फ्रान्सने विश्वविजयाला गवसणी घातली. फ्रान्सने 4-2 अशा फरकाने सामना जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. या विश्वसोहळ्याच्या बक्षिस वितरणावेळी जगभरातील दिग्गजांनी व्यासपीठावर हजेरी लावली होती. त्यावेळी अनेक देशांच्या प्रमुखांनीही पावसात मनुरादपणे भिजण्याचा आनंद घेतला. पण, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या डोक्यावरील छत्री हालू दिली नाही. या सोहळ्यात पावसापासून बचाव करण्यासाठी व्लादिमीर पुतीन यांच्या डोक्यावर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी छत्री धरल्याचे दिसत आहे.

ओमर अब्दुल्ला यांचे ट्विट- पुतीन यांच्या छत्रीने फिफा विश्वचषकातील बक्षिस वितरण सोहळ्याची शोभा घालवली.

पुतीन यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच या फोटोवरुन पुतीन यांच्यावर जोक्सचा पाऊसही पडत आहे. क्रोएशियाने विश्वचषक जिंकण्याची, तर पुतीन यांनी पावसात भिजण्याची संधी घालवली, असे काही नेटीझन्सने म्हटले आहे. तर, रशियात केवळ एकच छत्री आहे का ? असा प्रश्नही विचारण्यात आला आहे.  

एका ट्विटर युजर्सचा खोचक सवाल ? 

ही माझी छत्री आहे माझी, तुमची नाही. तुम्ही फ्रेंचवाले पहिलं पावसात भिजा जा. 

 

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनSocial Mediaसोशल मीडियाJokesविनोदFifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८