शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

म्यानमारमध्ये धार्मिक भेदभाव नाहीच, लष्करी अधिकाऱ्यांनी दिली पोप फ्रान्सिस यांना माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 13:46 IST

म्यानमारमध्ये कोणत्याही प्रकारचे धार्मिक भेदभाव होत नसल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी पोप फ्रान्सिस यांना दिली. पोप गेले दोन दिवस म्यानमारच्या भेटीवर आहेत.

ठळक मुद्देसुमारे १३ लाख लोकसंख्येचा असणारा रोहिंग्या हा एक मुस्लीम संप्रदाय आहे. म्यानमारमधील राखिन प्रांतात यांची सर्वात जा वस्ती होती. मात्र म्यानमारने या मुस्लीमांना नागरिकत्व देण्यास नकार दिला.

यांगोन- म्यानमारमध्ये कोणत्याही प्रकारचे धार्मिक भेदभाव होत नसल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी पोप फ्रान्सिस यांना दिली. पोप गेले दोन दिवस म्यानमारच्या भेटीवर आहेत. रोहिंग्यांचा प्रश्न, राखिन प्रांतातील तणाव, लाखो रोहिंग्यांचे पलायन या पार्श्वभूमीवर पोप यांच्या दौऱ्याला अत्यंत महत्त्व आले आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेतील शांततादूत म्हणून ओळखले जाणारे धार्मिक गुरु डेस्मंड टूटू यांनीही म्यानमारच्या नेत्या आंग सान सू की यांना राखिन प्रांतात शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले होते.म्यानमारचे सिनिअर जनरल मिन आंग ह्लांग यांनी पोप यांची यांगोन येथे 15 मिनिटे भेट घेतली. या बैठकीत म्यानमारमध्ये वंश आणि धर्माच्या आधारावर भेदभाव केला जात नाही, तसचे सर्व धर्मियांना आपापल्या धर्माने दिलेले उपासनेचे अधिकार येथे जोपासता येतात असे त्यांनी सांगितले. पोप फ्रान्सिस यांनी यापुर्वीही रोहिंग्यांच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली होती. म्यानमारच्या लष्करावर जगभारतील विविध नेत्यांनी आणि देशांनी मानवी अधिकारांचे उल्लंघन केल्याचे आरोप केले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपासून म्यानमारच्या लष्कराने राखिन प्रांतामध्ये अत्याचारांस सुरुवात केली असून त्यामुळे रोहिंग्या जीव मुठित धरून बांगलादेशच्या दिशेने पळून गेले असे रोहिंग्या आंदोलकांचे पुर्वीपासून म्हणणे आहे. त्यामुळेच म्यानमारच्या लष्करावर आणि आंग सान सू की यांच्यावर चोहोबाजूंनी टीका सुरु झाली. म्यानमार सरकारने रोहिंग्याच्या परतीच्या  मार्गात भूसुंरुंग पेरल्याचाही त्यांच्यावर आरोप केला जातो. सुमारे १३ लाख लोकसंख्येचा असणारा रोहिंग्या हा एक मुस्लीम संप्रदाय आहे. म्यानमारमधील राखिन प्रांतात यांची सर्वात जा वस्ती होती. मात्र म्यानमारने या मुस्लीमांना नागरिकत्व देण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे म्यानमारमध्ये त्यांच्यावर शिक्षण, विवाह, जमिन अधिग्रहण अशा अनेक क्षेत्रांवर बंधने लादली आहेत. स्थानिक बौद्ध व रोहिंग्या यांचे संबंधही नेहमीच तणावाचे राहिले आहेत. वांशिक आणि भाषिक कारणांमुळे या दोन्ही गटांमध्ये नेहमीच संघर्ष झालेला आहे. २०१२ साली दोन्ही वांशिक गटांमध्ये झालेल्या संघर्षामध्ये शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आणि सुमारे एक लाख चाळीस हजार नागरिकांना घरे सोडावी लागली. गेल्या तीन वर्षांमध्ये एक लाख वीस हजार रोहिंग्यांनी स्थलांतर केल्याचा युएनचा अंदाज आहे. रोहिंग्याना आता या जगात आपले कोण नाही याची जाणिव होत चालली आहे. त्यांना स्वीकारायला कोणीच उत्सुक नाही. इंडोनेशियासह अनेक देशांनी जबाबदारी झटकल्याने युएननेही चिंता व्यक्त केली आहे. सतत पाण्यावरतीच भरकटत राहिल्याने रोहिंग्यांना बोट पिपल अशा नव्या संज्ञेने ओळखले जात आहे. 

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याMyanmarम्यानमार