शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'केंब्रिज अॅनॅलिटिकासारखे डेटा चोरीचे आणखी प्रकार समोर येऊ शकतात' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 14:25 IST

फेसबुकच्या सीईओ शेरिल सँडबर्ग यांचे विधान

केंब्रिज अॅनॅलिटिका डेटा लिक प्रकरणामुळे जगभरात टीका सहन करावी लागली होती. मात्र आता फेसबुकच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. केंब्रिज अॅनॅलिटिका डेटा लिकसारखी आणखी प्रकरणे समोर येऊ शकतात, असे फेसबुकच्या चीफ ऑपरेशन ऑफिसर शेरिल सँडबर्ग यांनी म्हटले आहे. फेसुबकच्या वरिष्ठ अधिकारी वर्गात सँडबर्ग यांचे स्थान दुसऱ्या क्रमांकाचे आहे. संस्थापक मार्क झुकेरबर्गनंतर सँडबर्ग यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे त्यांचे विधान अतिशय महत्त्वाचे मानले जाते. 'केंब्रिज अॅनॅलिटिका डेटा लिक प्रकरणाचा तपास सुरु आहे. मात्र असे आणखीही प्रकार उजेडात येऊ शकतात,' असे सँडबर्ग यांनी एनबीसीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हटले. वापरकर्त्यांना त्यांची माहिती वापरली जाऊ नये, असे वाटत असेल तर त्यांनी त्या माहितीसाठी पैसे मोजावेत, असे म्हणत  सँडबर्ग यांनी 'पेड सेवे'चे संकेत दिले. सँडबर्ग यांच्या मुलाखतीचे टीव्हीवर प्रक्षेपण झाल्यानंतर, पेड सेवा देण्याबद्दल फेसबुकला प्रश्न विचारण्यात आले. मात्र असा कोणताही विचार नसल्याचे फेसबुकने स्पष्ट केले. सँडबर्ग या जर-तरच्या स्थितीत पेड सेवेबद्दल बोलत होत्या, असे स्पष्टीकरण फेसबुकने दिले. 'फेसबुककडून वापरकर्त्यांच्या माहितीची काळजी घेतली जाते. वापरकर्त्यांची माहिती गोपनीयता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. मात्र केंब्रिज अॅनॅलिटिका प्रकरणात आम्ही माहितीची गोपनीयता राखण्यात कमी पडलो,' असे सँडबर्ग यांनी मुलाखतीत सांगितले. केंब्रिज अॅनॅलिटिकामध्ये काम केलेल्या एका व्यक्तीने फेसबुकवरुन 5 कोटी वापरकर्त्यांची माहिती चोरीला गेल्याची बाब गेल्या महिन्यात उघडकीस आणली होती. वापरकर्त्यांची माहिती लिक होत असल्याचे पहिल्यांदा 2015 मध्ये समोर आले असताना फेसबुकला याबद्दल पावले उचलण्यासाठी वेळ  का लागला, असा प्रश्नही सँडबर्ग यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, 'त्यांनी आम्हाला माहिती डिलीट करण्याचे आश्वासन दिले होते,' असे उत्तर सँडबर्ग यांनी दिले.  

टॅग्स :FacebookफेसबुकCambridge Analyticaकेम्ब्रिज अ‍ॅनालिटिका