शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

...तर हजारो रुग्णांचा होऊ शकतो मृत्यू; पॅलेस्टिनींना उत्तर गाझा सोडण्याचे इस्रायलचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 05:54 IST

जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त

देइर-अल-बलाह : इस्रायल- हमासमध्ये आठवडाभरापासून सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने पॅलेस्टिनी नागरिकांना उत्तर गाझा परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले. त्यासाठी रविवारी तीन तासांची मुदतही दिली; परंतु, येथील रुग्णालयांमध्ये नवजात शिशूंसह आयसीयूतील दाेन हजार लोकांना बाहेर काढणे, म्हणजे जणू त्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यासारखे आहे, अशी चिंता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली.

रुग्णालयाकडे सध्या केवळ दोन दिवस पुरेल इतकेच इंधन शिल्लक आहे. ते संपल्यास हजारो निष्पाप रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्राने दिला. अन्न-पाण्याअभावी गाझामध्ये लोकांचे प्राणांतिक हाल होत आहेत. लहान मुलांना किमान दूधही मिळत नसल्याचेही परिस्थिती निर्माण झाली आहे. मुलांसाठी ब्रेड, दूध घेण्यासाठी लोकांची धावपळ होत आहे.

पाऊल उचलण्यापूर्वी चालते व्हा! उत्तर गाझा रिकामा करण्यासाठी इस्रायलने आदेश जारी केले. त्यात म्हटले की, तातडीने हा परिसर रिकामा करा आणि दक्षिणेकडे चालते व्हा. हमासला संपविण्यासाठी आम्ही लवकरच मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहोत. उत्तर गाझात सुमारे १० लाख पॅलेस्टिनी राहतात. दुसरीकडे मात्र हमासने गाझातील लोकांना घरातच राहण्याचे आदेश दिले.

रुग्णालयात खाटा भरल्या; झाडाखाली होतात उपचारगाझातील प्रमुख रुग्णालय असलेल्या अल-शिफा रुग्णालय जखमी लोकांमुळे अक्षरश: भरून वाहत आहे. पाय ठेवायलाही जागा नसल्याने परिसरातील झाडाखाली जखमींवर उपचार केले जात आहे. लोकांना सध्या रुग्णालय हीच सुरक्षित जागा वाटत आहे. हल्ल्यात घरे जमीनदोस्त झाल्याने अनेकजण उपचारानंतरही रुग्णालयातच राहत आहेत.

हमासला संपवणारच इस्रायली नागरिकांच्या मृत्यूचा बदला घेतला जाईल. हमासला पूर्णपणे संपविल्याशिवाय शांत बसणार नाही. यासाठी  जगभरातील नेत्यांशी चर्चा सुरू आहे. - बेंजामिन नेतन्याहू, पंतप्रधान, इस्रायल

आतापर्यंत झाले सर्वाधिक मृत्यूइस्रायलच्या हल्ल्यात आठवडाभरात २,३२९ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला. आतापर्यंत झालेल्या पाच युद्धांपैकी या युद्धात सर्वाधिक बळी गेले.२०१४ मध्ये २,२५१ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला होता.हमासच्या हल्ल्यात भारतीय वंशाचे २ इस्रायली अधिकारी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बायडेन यांची नेतन्याहू, अब्बास यांच्याशी चर्चा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू व पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी चर्चा केली.पॅलेस्टिनी लोकांसाठी हमास लढत नसल्याने त्यांचा विरोध करा, असे ते म्हणाले.  

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध