शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 14:53 IST

सिप्रीच्या अहवालानुसार, जानेवारी २०२५ पर्यंत जगभरात अंदाजे १२,२४१ अण्वस्त्रे होती. त्यापैकी सुमारे ९,६१४ शस्त्रे लष्करी वापरासाठी तैनात करण्यात आली होती.

इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. दरम्यान, आता आणखी एका देशाने अण्वस्त्रांचा मुद्दा उपस्थित केला आहे.'जर दक्षिण कोरियावर हल्ला झाला तर अमेरिका उत्तर कोरियावर हल्ला करू शकते, असा मोठा दावा दक्षिण कोरियाच्या एका अधिकाऱ्याने केला. दक्षिण कोरिया सरकार किंवा अमेरिकन प्रशासनाकडून यावर कोणतीही अधिकृत टिप्पणी आलेली नाही. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्ये बऱ्याच काळापासून तणाव सुरू आहे.

आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, गुप्तचर संस्थेच्या संचालक पदाचे उमेदवार ली जोंग-सोक म्हणाले की, जर प्योंगयांगने हल्ला केला तर अमेरिका उत्तर कोरियावर अणुबॉम्बने हल्ला करेल असा त्यांचा विश्वास आहे. उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन आहेत. त्यांनी म्हटले की, प्योंगयांगने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे तैनात केली तरीही वॉशिंग्टन उत्तरेवर हल्ला करेल आणि अमेरिकेला धोका निर्माण करेल.

सिप्रीच्या अहवालानुसार, जानेवारी २०२५ पर्यंत जगभरात अंदाजे १२,२४१ अण्वस्त्रे होती. त्यापैकी सुमारे ९,६१४ शस्त्रे लष्करी वापरासाठी तैनात करण्यात आली होती. यापैकी सुमारे ३,९१२ अण्वस्त्रे क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांसह तैनात करण्यात आली होती. यापैकी सुमारे २,१०० शस्त्रे 'हाय अलर्ट' स्थितीत होती, म्हणजेच तात्काळ वापरासाठी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवर तयार होती.

हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज

 इराणने इस्त्रायलच्या हॉस्पिटलवर मिसाईल हल्ला केल्यानंतर इस्त्रायली संरक्षण मंत्री यांनी तेहरानवर नव्या पद्धतीने हल्ला करण्याची घोषणा केली आहे. त्याशिवाय इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांनाही संपवण्याचा उघड इशारा त्यांनी दिला आहे. याआधीही इस्त्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी इराणला हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल असा कठोर इशारा दिला होता. 

इस्त्रायलचे संरक्षण मंत्री कॅट्ज म्हणाले की, दक्षिणी इस्त्रायलच्या सोरोका हॉस्पिटलवर बॅलेस्टिक मिसाईलने हल्ला झाला आहे. या हल्ल्यासाठी इराणचे नेते अली खामेनेई यांना वॉर क्राईमसाठी जबाबदार ठरवले आहे. हा हुकुमशाह एका बंकरखाली बसला आहे. जाणुनबुजून इराण इस्त्रायलमधील हॉस्पिटल आणि नागरी वस्त्यांना टार्गेट करत आहे. हे खूप वाईट वॉर क्राइम आहे. याची शिक्षा खामेनेई यांना मिळायला हवी असं त्यांनी म्हटलं. 

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनAmericaअमेरिका