शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 20:51 IST

China-America Deal: अमेरिका आणि चीनमध्ये मोठी डील झाली आहे. चीनने रेअर अर्थ मेटलचा पुरवठा थांबविल्याने भारतासह जगभरातील सर्व देश संकटात सापडले आहेत.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने चीनच्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत पाठविण्याची घोषणा केली होती. हार्वर्ड विद्यापीठाचे अधिकार काढून घेत अमेरिकेने चिनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरही रोख लावली होती. परंतू, आज डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. दुर्मिळ खनिजाच्या बदल्यात चिनी विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षण देण्यात येणार आहे. 

अमेरिका आणि चीनमध्ये मोठी डील झाली आहे. चीनने रेअर अर्थ मेटलचा पुरवठा थांबविल्याने भारतासह जगभरातील सर्व देश संकटात सापडले आहेत. भारतात जुलैमध्ये ऑटोमोबाईल कंपन्यांचे उत्पादन बंद होण्याची शक्यता आहे. दुर्लभ खनिज आमि मॅग्नेट या गोष्टी ऑटोमोबाईल कंपन्यांना लागणार आहेत. अशातच ट्रम्प यांनी चीनला विद्यार्थ्यांवरून ब्लॅकमेल करत ही रेअर अर्थ मेटल आपल्या पदरात पाडून घेतली आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून कधी अवैध प्रवासी, कधी व्हिसा देण्यास नकार तर कधी व्यापारावर कर अशा विविध मार्गांनी जगभरातील देशांना ब्लॅकमेल करत आहेत. हे ट्रम्प यांचे पहिल्या कारकीर्दीपेक्षा वेगळेच रुप आहे. युक्रेनने ही दुर्मिळ खनिजे दिली नाहीत तर अमेरिका रशियाविरोधात लढण्यासाठी शस्त्रे देणार नाही, अशी उघड धमकी देत ट्रम्प यांनी युक्रेनी राष्ट्राध्यक्षांसोबत हुज्जत घातली होती. तसेच त्यांना व्हाईट हाऊसमधून हाकलून दिले होते. हीच रणनिती ट्रम्प चीनविरोधात वापरत आहेत. 

चीन आणि अमेरिकेत आज एक असा करार झाला आहे ज्यानुसार चीन अमेरिकेला ही दुर्मिळ खनिजे पुरविणार आहे, त्या बदल्यात अमेरिका चिनी विद्यार्थ्यांना आपल्या विद्यापीठांत शिकण्याची परवानगी देणार आहे. ट्रम्प आणी तीनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून ट्रेड टेरिफ वॉर सुरु झाले होते. हा तणाव कमी करण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल असल्याचे मानले जात आहे. ट्रम्प यांनी या डीलला राजनैतिक विजय असल्याचा करार दिला आहे, परंतू अद्याप चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची अंतिम मंजुरी मिळालेली नाही. 

ट्रम्प यांनी हा करार पूर्ण झाल्याचे म्हटले आहे, तो आता शी यांच्या अंतिम मंजुरीसाठी जाणार आहे, असे म्हटले आहे. चीन आम्हाला मॅग्नेट आणि सर्व आवश्यक दुर्मिळ खनिजे देणार आहे, त्यानंतरच अमेरिका चिनी विद्यार्थ्यांना आमच्या महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याची परवानगी देणार आहे. आम्हाला ५५% कर मिळत आहे, तर चीनला १०% कर मिळतो. आमचे संबंध उत्तम आहेत, असेही ट्रम्प यांनी पुढे जाऊन म्हटले आहे. 

अमेरिका आणि चीनच्या मध्ये पिसल्या जाणाऱ्या भारतासह इतर देशांची ट्रम्प यांच्या या स्वार्थी वागण्यामुळे कोंडी झाली आहे. भारतालाही या रेअर अर्थ मेटलची अत्यंत गरज आहे. वाहन उद्योगाच्या संघटनेने जर हे रेअर अर्थ मेटल मिळाले नाहीत तर जुलैमध्ये ऑटोमोबाईल उत्पादन बंद पडेल असे म्हटले आहे. तसेच मोदींना यात लक्ष घालण्यास सांगितले आहे. आता मोदी यावर काय हालचाली करतात याकडे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पchinaचीनAmericaअमेरिका