शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

युद्ध आणखी पेटणार..., आता पाकिस्तान सौदीच्या मदतीसाठी मैदानात उतरणार? मुनीर रियाधमध्ये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 12:29 IST

इराणच्या या कृतीने संपूर्ण प्रदेशाची सुरक्षितता आणि स्थिरता धोक्यात येत आहे. हा चर्चेचा मुख्य मुद्दा होता. इराणी पक्ष समजदारी दाखवेल आणि कुठलीही चुका करणे टाळेल, अशी आम्हाला आशा आहे."

सौदी अरेबियाचे संरक्षण मंत्री प्रिन्स खालिद बिन सलमान यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये इराणकडून होणाऱ्या हल्ल्यांना रोखण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. यासंदर्भात खुद्द प्रिन्स खालिद यांनी 'X' पोस्ट करत माहिती दिली. यात त्यांनी म्हटले आहे की, "मी पाकिस्तानचे लष्करप्रमुख तथा संरक्षण दल प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांची भेट घेतली. आमच्या संयुक्त धोरणात्मक संरक्षण कराराच्या कक्षेत झालेल्या इराणच्या हल्ल्यांसंदर्भात आणि ते रोखण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा झाली. इराणच्या या कृतीने संपूर्ण प्रदेशाची सुरक्षितता आणि स्थिरता धोक्यात येत आहे. हा चर्चेचा मुख्य मुद्दा होता. इराणी पक्ष समजदारी दाखवेल आणि कुठलीही चुका करणे टाळेल, अशी आम्हाला आशा आहे."

पाकिस्तानची कोंडी?तज्ज्ञांच्या मते, इराणच्या आक्रमकतेचा सामना एकट्याने करण्याची सौदीची इच्छा नाही. यासाठी तो पाकिस्तानला आपल्या बाजूने लढण्यास भाग पाडत आहे. दोन्ही देशांमधील विद्यमान संयुक्त धोरणात्मक संरक्षण करारानुसार, सौदी अरेबिया पाकिस्तानला स्वतःसाठी लढण्यास भाग पाडू शकतो. आर्थिक मदत, तेल पुरवठा आणि गुंतवणुकीद्वारे सौदी अरेबिया, आर्थिक दृष्ट्या पिचलेल्या पाकिस्तानला मदत करतो. शिवाय, पाकिस्तानकडेही मदत करण्याशिवाय पर्याय उरत नाही. यामुळे आता खालिद आणि मुनीर भेटीनंतर, पाकिस्तान इराणविरुद्ध कारवाई करेल का? हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरेल.

इराणचे जबरदस्त हल्ले - खरेतर, इराणकडून सौदीवर सातत्याने हल्ले होत असतानाच ही भेट झाली आहे. सौदीच्या संरक्षण मंत्रालयाने एक्सवर दिलेल्या माहितीनुसार, 'शायबह ऑईल फिल्ड'च्या दिशेने येणारे १६ ड्रोन हवाई दलाने पाडले. तसेच अल-खरज येथील प्रमुख औद्योगिक क्षेत्रावर आलेली बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रेही नष्ट करण्यात आली आहेत. २८ फेब्रुवारीनंतरचा हा इराणचा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे.

वाढता तणावप्रदेशातील वाढत्या तणावाबरोबरच, युएईनेही गेल्या २४ तासांत १२५ हून अधिक ड्रोन आणि ६ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे निकामी केली आहेत. खरेतर, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा बदला म्हणून, इराणकडून हे हल्ले केले जात आहेत. दरम्यान, अरब लीग आणि इस्लामिक सहकार्य संघटनेने (OIC) या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : War Escalates: Pakistan to help Saudi against Iran?

Web Summary : Saudi Arabia seeks Pakistan's support against Iranian attacks, citing a mutual defense pact. Recent meetings indicate Saudi Arabia's desire for Pakistan to assist in countering Iranian aggression, especially after attacks on Saudi oil fields and industrial areas. Pakistan's involvement remains uncertain.
टॅग्स :AudiआॅडीPakistanपाकिस्तानIranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिका