शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज!
2
IND vs SA: गुवाहाटी कसोटीत भारताचा विजय अशक्य का? आतापर्यंत एकदाच गाठलाय ३००+ स्कोर!
3
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
5
बिग बॉस मराठी ६ लवकरच...! अखेर झाली घोषणा, कोण असणार होस्ट? प्रेक्षकांची वाढली उत्सुकता
6
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
7
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
8
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
9
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
10
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
11
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
12
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
13
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
14
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
15
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
16
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
17
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
18
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
19
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
20
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
Daily Top 2Weekly Top 5

६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 05:30 IST

दोन्ही बाजूंना शांतता पाळण्याचे केले आवाहन

जेरुसलेम : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टीसाठी सुचवलेल्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर पॅलेस्टाइन व इस्रायलने सहमती दर्शवली आहे. या योजनेनुसार इस्रायलचे २० ओलीस नागरिक सोडण्यास हमास राजी झाला असून त्या बदल्यात इस्रायलकडून पॅलेस्टाइन बंदीवानांची सुटका केली जाणार आहे.

हमासच्या म्हणण्यानुसार त्यांचे दोन हजार नागरिक इस्रायलच्या तुरुंगात आहेत. यातील १७०० नागरिक सध्याच्या संघर्षात इस्रायलने ताब्यात घेतले आहेत तर सुमारे २५० नागरिक दीर्घकाळाचा तुरुंगवास भोगत आहेत. इस्रायलचे कॅबिनेट लवकर या योजनेला संमती देणार आहे. या निर्णयामुळे २ वर्षांपासून जगण्यामरण्याच्या संघर्षात अडकलेल्या लाखो नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे जगभरातून स्वागत केले जात आहे.

गाझामधून शुक्रवारपासून इस्रायलचे सैन्य माघार घेणार

ट्रम्प यांच्या शांतता योजनेनुसार इस्रायल शुक्रवारपासून आपले पूर्ण सैन्य गाझा पट्टीतून माघार घेण्यास सुरूवात करणार आहे. तसेच गाझा पट्टीत वैद्यकीय व अन्नसेवा लवकर पोहोचविण्यासाठी पाच सीमा खुल्या केल्या जाणार आहेत. सध्या इस्रायलचे सैन्य गाझा शहर, खान युनिस, राफा आणि उत्तर गाझा भागात तैनात आहे. गाझा सध्या बेचिराख झाले आहे.

गाझा शांतता योजनेचे मोदींकडून स्वागतगाझा पट्टीत शांतता पाळण्याच्या ट्रम्प प्रस्तावाचे पंतप्रधान मोदी यांनी स्वागत केले आहे. ट्रम्प यांच्या या प्रस्तावाचे आपण स्वागत करत असून, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या कणखर नेतृत्वाचेही हे प्रतिबिंब असल्याची प्रतिक्रिया मोदींनी दिली. मोदी यांच्याव्यतिरिक्त तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष तय्यप एर्दोगान, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसि, चीनचे परराष्ट्र खाते, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गुटेरेस, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन, जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ, जॉर्डनचे परराष्ट्रमंत्री, इटलीच्या पंतप्रधान मेलोनी, कॅनडा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, जपान या देशांना प्रस्तावास पाठिंबा देत शुभेच्छा दिल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Israel, Palestine Agree to Trump Plan After 67,194 Lives Lost

Web Summary : Israel and Palestine agreed to Trump's peace plan for Gaza. Hamas will release Israeli hostages in exchange for Palestinian prisoners. Israel will withdraw troops from Gaza, opening borders for aid. The plan is welcomed globally, including by Modi.
टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायल