शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यांत पाणी, ‘गोल्डन गेट ब्रिज’ची वारी थेट पंढरपूरला; बीएमएम अधिवेशनाचा शानदार समारोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 06:42 IST

सुनील गावस्कर आणि सौरभ नेत्रावळकर एका व्यासपीठावर

थेट अमेरिकेतून अपर्णा वेलणकर

सान होजे : ज्याची शैलीदार बॅटिंग टीव्हीवर ‘बघण्या’साठी एकेकाळी कित्येकदा खोट्या ‘सिक लिव्ह’ टाकल्या त्या सुनील गावस्कर याला (यांना नव्हे) मानाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सान होजेला जमलेल्या सहा हजार मराठी माणसांनी गेले चार दिवस रंगत गेलेल्या एकविसाव्या बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशनाचा शानदार समारोप केला. 

‘आधारकार्ड इंडिया टीम’च्या सुनीलबरोबर ‘ग्रीन कार्ड इंडिया टीम’मधून मैदान गाजवणाऱ्या सौरभ नेत्रावळकरलाही त्यांनी या माहेरच्या मंचावर कौतुकाने बोलावले आणि खुद्द ‘सुनील सरां’कडून कौतुक ऐकताना भारावलेल्या नम्र सौरभला काय बोलावे हे सुचेना! अशीच निःशब्द अवस्था केली ती  महेश काळे, भगवान रामपुरे, अच्युत पालव आणि मुक्ता बर्वे यांनी रंगवलेल्या “अभंग वारी’ने! एकीकडे रामपुरे ओल्या मातीला आकार देत विठ्ठलाची मूर्ती ‘लाईव्ह’ घडवताहेत, दुसरीकडे अच्युत पालवांच्या  कॅनव्हासवर अक्षरातून विठ्ठल उभा राहतो आहे, मुक्ता तर बोलता बोलता थेट वारीमध्ये चालायला घेऊन गेली आहे आणि महेश काळेने उभ्या केलेल्या अभंगांच्या स्वर-कल्लोळाने उचंबळून आलेले काळीज दूर राहिलेल्या माहेराच्या आठवणीने हेलावून गेले आहे.

पायजे कशाला हेल्मेट ?‘इतक्या डेंजर फास्ट बॉलर्सचा सामना केलास, पण आयुष्यात कधी हेल्मेट नाही वापरलेस... नाकापर्यंत बॉल उसळायचे, भीती नाही का वाटली?’ - मुलाखतकार  मंगेश जोशी यांच्या या प्रश्नावर गावस्करने काय उत्तर द्यावे?- अरे मंगेश, तू इतक्यांदा मला भेटला आहेस, तुला हे कळले नाही का की (स्वतःच्या डोक्याकडे बोट करत) ‘इथे’ आत काही नाहीये... कशाला लागतं हेल्मेट “- जुन्या आठवणी रंगवून सांगणाऱ्या या धमाल गप्पांमध्ये आधुनिक  क्रिकेटवर गावस्करने केलेली ही एकच पण टोकदार कमेंट !

माझी तीन स्वप्नं आहेत... सौरभ नेत्रावळकरचे प्रशिक्षक राज बडदरे मराठी अन् इथलेच. सुनील गावस्कर यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना त्यांना भरून आले. ते म्हणाले, माझी तीन स्वप्नं आहेत : भारताने २०२५ ची टेस्ट चॅम्पियनशिप जिंकावी , विमेन्स क्रिकेटचा वर्ल्ड कप  भारताने जिंकावा आणि २०२६ साली टीट्वेंटी वर्ल्ड कप फायनलमध्ये इंडिया अन् अमेरिका आमने-सामने असावेत!

..शेवटी  स्टेजवरून खाली उतरलेली विठ्ठलाची पालखी बघता बघता डोईला टोपी, कपाळावर अबीर बुक्क्याचा टिळा लावलेल्या माणसांच्या लाटांमध्ये शिरली आणि विठूच्या नावाचा गजर करताकरता प्रत्येकाला आनंदाचा कढ आला! झरणारे डोळे आणि खिळलेले पाय...  ‘संमेलन संपले आहे, आता घरी परतायचे ‘याचेही भान हरवून गेले होते. आता २०२६ साली बीएमएमचे पुढील संमेलन सिएटल येथे होईल !