शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

पुतिन यांच्या पोर्टेबल टाॅयलेटचं रहस्य! ‘सिक्रेट’ नेमकं आहे तरी काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 06:40 IST

का करतात पुतिन असं? गेल्या अनेक वर्षांपासून पुतिन यांच्या आरोग्याविषयी, त्यांच्या प्रकृतीविषयी अनेक विवाद आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी कोणकोणत्या गोष्टी जगापासून लपवून ठेवाव्यात? त्यांचं खासगी जीवन, त्यांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया, त्यांना झालेली मुलं, ते कुठे जातात, काय करतात, त्यांचं आरोग्य इथपासून ते अगदी स्वत:चं मलमूत्रही ते लपवून ठेवतात! काही पत्रकारांनी ही शोधपत्रकारिता केली आहे. पुतिन जेव्हा जेव्हा अंतरराष्ट्रीय दौऱ्यावर जातात, त्या प्रत्येकवेळी ते स्वत:चं पोर्टेबल टॉयलेट सोबत नेतात. त्यांच्यासोबतचे बॉडीगार्ड त्यांचं हे मलमूत्र एका विशेष पॅकेटमध्ये एकत्र करतात, जेणेकरून त्याची कुठलीही दुर्गंधी येऊ नये. हे पॅकेट नंतर खास त्यासाठीच बनवलेल्या एका सुटकेसमध्ये ठेवलं जातं. पुतिन परदेश दौऱ्यावरून पुन्हा मायदेशी परतले की मग या मलमूत्राची विल्हेवाट लावली जाते! 

का करतात पुतिन असं? गेल्या अनेक वर्षांपासून पुतिन यांच्या आरोग्याविषयी, त्यांच्या प्रकृतीविषयी अनेक विवाद आहेत. काहींच्या मते पुतिन यांना कॅन्सर झालेला आहे. काहींच्या मते पुतिन मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. काही रिपोर्ट्सनुसार पुतिन यांना डिमेन्शिया झाला आहे, तर काही रिपोर्ट सांगतात, पुतिन हे त्यांना नेमका कोणता आजार आहे, हे मात्र आजपर्यंत खात्रीनं कोणालाही कळू शकलेलं नाही. परदेश दौऱ्यावर गेल्यानंतर पुतिन आपल्यासोबत खास पोर्टेबल टॉयलेट नेतात याचं कारणही तेच आहे. ज्या देशात आपण जात आहोत, तिथल्या लोकांनी, तिथल्या सरकारनं या मलमूत्राचं पृथक्करण करून आपल्याला कोणता आजार झाला आहे, हे शोधून काढलं तर?.. - पुतिन यांना तीच भीती वाटते आहे. त्यामुळे आपला आजार जगापासून लपवून ठेवण्यासाठी गेली अनेक वर्षे ते खबरदारी घेत आहेत आणि आपला आजार शोधून काढण्याची कोणतीही संधी आजवर त्यांनी कधीच कोणाला दिलेली नाही. 

‘एएफपी’ या विदेशी वृत्तसंस्थेच्या एका ताज्या रिपोर्टनुसार पुतिन यांच्यासोबत जे बॉडीगार्ड असतात, त्यांची खास या कामासाठीच नियुक्ती केलेली असते. पुतिन यांच्या तब्येतीची काळजी घ्यायची आणि त्यांच्या अत्यावश्यक गरजांची पूर्तता  करायची! 

फ्रेंच न्यूज मॅगझिन ‘पॅरिस मॅच’चे पत्रकार रेजिस जेंते यांनीदेखील म्हटलं आहे की, पुतिन यांचे मलमूत्र ‘सांभाळण्यासाठी’, त्याची गुप्तता ठेवण्यासाठी खास ‘फेडरल प्रोटेक्शन एजंट्स’ची नियुक्ती करण्यात आली आहे. पुतिन परदेश दौऱ्यावर असतानाही त्यांच्या मलमूत्राचा कोणताही अवशेष मागे न ठेवता पुन्हा मायदेशी घेऊन येणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी आहे. या मॅगझिनमध्ये दावा करण्यात आला आहे की, पुतिन यांनी २०१७ मध्ये जेव्हा फ्रान्सचा दौरा केला होता त्यावेळी आणि २०१९ मध्ये सौदी अरेबियाला त्यांनी भेट दिली होती, त्यावेळी त्यांच्या मलमूत्राचे कोणतेही अवशेष मागे ठेवण्यात आले नव्हते, याबाबतचे पुरावे आमच्याकडे आहेत. बीबीसीच्या माजी पत्रकार फरिदा रुस्तमोवा यांनीही ट्विट करून म्हटले आहे की, पुतिन ज्या ज्यावेळी परदेश दौऱ्यावर जात, त्या त्यावेळी पोर्टेबल टॉयलेट सोबत नेतात, याविषयी मला सांगण्यात आले होते. हे मलमूत्र पुन्हा रशियात आणण्यापेक्षा काहीवेळा त्या त्या देशातच ते नष्ट करण्यात आले होते, असा दावाही सूत्रांनी केला आहे. 

पुतिन यांना नेमक्या कोणत्या आजारानं ग्रासलं आहे, याबाबत अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर त्यात वाढ झाली आहे. गेल्या महिन्यातच रशियाच्या ‘द प्रोजेक्ट’ या नियतकालिकाच्या पत्रकारांनीही पुतिन गंभीर आजारी आहेत आणि गुप्तपणे ते कॅन्सरतज्ज्ञाला भेटत असतात, याबद्दलची ‘बातमी’ फोडली होती. पुतिन स्वत:ला ‘स्थिर’ ठेवण्यासाठी कायम टेबलाचा आधार घेतात. त्यांची ही कृती म्हणजे त्यांची प्रकृती ढासळत असल्याचीच निशाणी आहे, असा दावाही पत्रकारांतर्फे केला जातोय. खरंखोटं पुतिन यांनाच माहीत, पण त्यांच्या रहस्यमय व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच त्यांच्या प्रकृतीचं गूढही अधिकाधिक गडद होत चाललं आहे. 

‘सिक्रेट’ नेमकं आहे तरी काय? २०१९ मध्ये पॅरिस येथे आयोजित ‘युक्रेन समिट’मध्ये पुतिन यांच्याबरोबर त्यांच्या सहा बॉडीगार्ड्ंसना टॉयलेटमध्ये जाताना पाहण्यात आलं होतं. त्यातल्या पाचजणांची जबाबदारी त्यांच्या सुरक्षेची होती. पुतिन टॉयलेटमधून बाहेर आल्याबरोबर सहावा बॉडीगार्ड टॉयलेटमध्ये गेला होता. एका माजी पत्रकारानं दावा केला आहे की, ही नवी गोष्ट नाही. पुतिन यांनी जेव्हापासून रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी घेतली तेव्हापासूनच ते पोर्टेबल टॉयलेट स्वत:सोबत ठेवतात!

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशिया