शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ड्रॅगनची चाल...! लडाखमधील पँगॉन्ग सरोवरावर बांधला पूल, भारतासाठी धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 11:33 IST

तत्पूर्वी, वर्ष 2022 मध्ये, चिनी सेनिक पँगॉन्ग त्सो सरोवराच्या सर्वात अरुंद भागात एका पुलाचे काम करत असल्याचे वृत्त आले होते. यानंतर हा सर्व्हिस पूल असल्याचे समोर आले होते. ज्याचा वापर एका मोठ्या पुलाच्या निर्मितीसाठी करण्यात येत होता.

चीनने पँगॉन्ग त्सो सरोवरावर पुल तयार केला आहे. याचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. सॅटेलाइटच्या सहाय्याने घेण्यात आलेल्या फोटोंमधून याचा खुलासा झाला आहे. फोटोंमध्ये हा पूल स्पष्टपणे दिसत आहे. हा पूल लडाखमधील खुर्नाक भागात तलावाच्या सर्वात अरुंद भागात तयार करण्यात आला आहे. हा पूल लडाखच्या उत्तर आणि दक्षिण भागाला जोडतो. याच महिन्यात पुलाचे काम पूर्ण झाल्याचेही या सॅटेलाइट फोटोंवरून स्पष्ट होते. यामुळे आता चिनी पिपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांच्या हालचाली सोप्या होतील.

तत्पूर्वी, वर्ष 2022 मध्ये, चिनी सेनिक पँगॉन्ग त्सो सरोवराच्या सर्वात अरुंद भागात एका पुलाचे काम करत असल्याचे वृत्त आले होते. यानंतर हा सर्व्हिस पूल असल्याचे समोर आले होते. ज्याचा वापर एका मोठ्या पुलाच्या निर्मितीसाठी करण्यात येत होता.

लष्करी टँकसह जाणेही शक्य -डेमियन सायमन यांनी आपल्या X हँडलवर या पुलाचे नवे फोटो शेअर करत, फोटोवरून नवा पूल तयार झाला असल्याचे संकेत मिळतात, असे म्हटले आहे. पुलाच्या पृष्ठभागावर नुकतेच डांबर पसरवण्यात आले आहे. हा पूल या भागातील चिनी सैनिकांची गतिशीलता वाढवेल. याच्या सहाय्याने सरोवराच्या भागातील भारतीय ठिकानांपर्यंत सहजपणे पोहोचता येऊ शकेल. या पुलावरून चिनी सैनिक टँकसह जाऊ शकतील. यामुळे त्यांचे रेजांग ला सारख्या दक्षिणेकडील भागात जाणेही सोपे होईल. याच भागात 2020 मध्ये भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना हुसकावून लावले होते.

काय होणार परिणाम? -या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर, आता चीन आपले सैनिक आणि युद्धसाहित्य पँगॉन्ग सरोवराच्या भागात पाठवण्याच्या प्रयत्नात आहे. लडाखमध्येही विस्तारची त्याची योजना दिसत आहे. अशा परिस्थितीत चीन आपली आर्मी आणि शस्त्रास्त्रे तक्षिण भागात पोहोचवून काही ऑपरेशनच्या तयारीतही असू शकतो. कारण या पुलामुळे चीनला लडाखच्या दक्षिण भागात जाण्यासाठी 180 किलोमीटर फिरून यावे लागणार नाही.

टॅग्स :chinaचीनladakhलडाखIndiaभारतXi Jinpingशी जिनपिंग