शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

चंद्र चाललाय आपल्यापासून दूर; पृथ्वीवरील दिवस हाेईल २५ तासांचा; अमेरिकेतील शास्त्रज्ञांचे नवे संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 06:11 IST

९ कोटी वर्षांपूर्वीच्या एका दगडाचा या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. चंद्राची व्युत्पत्ती कशी झाली याच्या अभ्यासासाठी नव्या संशोधनातले निष्कर्षही उपयोगी ठरणार आहेत. 

नवी दिल्ली : हात तुझा हातात अन् धुंद ही हवा। रोजचाच चंद्र आज भासतो नवा नवा असे प्रेमीयुगुल ज्याच्या साक्षीने एकमेकांना साद घालतात तो चंद्र पृथ्वीपासून दूर जात आहे. त्यामुळे पृथ्वीला विरह जाणवणार की नाही याची कल्पना नाही. मात्र चंद्राच्या दूर जाण्याने पृथ्वीवरील दिवसाचा कालावधी २४ ऐवजी २५ तासांचा होण्याची शक्यता एका नव्या संशोधनाच्या निष्कर्षांतून वर्तविण्यात आली आहे.

या विद्यापीठात झालेले संशाेधन चंद्राने गेल्या अनेक शतकांपासून कलाकार, कवी, लहान मुले, प्रेमिकांना नेहमीच प्रेरणा दिली आहे. चंद्र हा प्रत्येकाचा सखा, मित्र आहे. त्याला कोणीही ज्येष्ठ व्यक्ती वगैरे मानत नाही.

चंद्राचा साहित्यात, बोलीभाषेत, लोकांच्या रोजच्या संभाषणात एकेरी उल्लेखच अधिक आढळतो. अशा या चंद्राबाबत अमेरिकेतील विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी नुकतेच संशोधन केले.

९ कोटी वर्षांपूर्वीच्या एका दगडाचा या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. चंद्राची व्युत्पत्ती कशी झाली याच्या अभ्यासासाठी नव्या संशोधनातले निष्कर्षही उपयोगी ठरणार आहेत. 

- ३,८४,४०० किलाेमीटर एवढे अंतर पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये आहे.- १.४ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवरील दिवसाचा कालावधी १८ तासांहून अधिक होता. मग त्यात काही कोटी वर्षांत वाढ होत राहिली.- यापुढील कोट्यवधी वर्षांत हीच प्रक्रिया तशीच सुरू राहील व दिवस २५ तासांचा होईल. - पृथ्वीभोवती भ्रमण करणारा चंद्र तिच्यापासून दूर जात राहिल्यास त्याचे काय परिणाम होतील, याचाही अभ्यास अमेरिकेतील विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील संशोधक करत आहेत. 

पृथ्वीवरील दिनमानावर परिणाम- विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, चंद्र दरवर्षी पृथ्वीपासून अंदाजे ३.८ सेंटिमीटर इतके अंतर दूर जात आहे. - त्यामुळे पृथ्वीवरील दिनमानावर त्याचा परिणाम होणार आहे. या घडामोडींमुळे पृथ्वीवरील एका दिवसाचा कालावधी एक तासाने वाढेल. म्हणजे तो २४ ऐवजी २५ तासांचा होईल.- ज्यावेळी हा बदल होईल त्यावेळी जगभरातील घड्याळे व वेळेशी संबंधित सर्व परिमाणे बदलावी लागणार आहेत.  

टॅग्स :Earthपृथ्वीAmericaअमेरिकाscienceविज्ञान