अमेरिकेच्या निवडणुकीत जिहादचा मुद्दा, ट्रम्प यांनी मुस्लीम देशांना दिली धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 11:33 PM2023-12-17T23:33:22+5:302023-12-17T23:34:01+5:30

ट्रम्प म्हणाले, राष्ट्रपती झाल्यानंतर मी बेकायदेशीरपणे येणाऱ्या लोकांची वैचारिक स्क्रीनिंग करेल.

The issue of Jihad in the US elections, Trump threatened Muslim countries | अमेरिकेच्या निवडणुकीत जिहादचा मुद्दा, ट्रम्प यांनी मुस्लीम देशांना दिली धमकी!

अमेरिकेच्या निवडणुकीत जिहादचा मुद्दा, ट्रम्प यांनी मुस्लीम देशांना दिली धमकी!

जर आपण दुसऱ्यांदा राष्ट्रपती झालो, तर बरेच लोक देश सोडून जातील. आपण जिंकताच मोठा बदल होईल. बरेच लोक देश सोडून पळून जाणार आहेत. कारण, पुन्हा एकदा जिहादी देशांवर बंदी आणली जाईल आणि त्यांच्या प्रवासावरही बंदी घातली जाईल, हे त्यांना समजेल, असे 2024 मध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीच्या प्रेसिडेंशिअल प्रायमरीमध्ये आघाडीवर असलेले अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ट्रम्प म्हणाले, राष्ट्रपती झाल्यानंतर मी बेकायदेशीरपणे येणाऱ्या लोकांची वैचारिक स्क्रीनिंग करेल. जर आपण अमेरिकेचा द्वेष करत असाल. जर आपण इस्रायलला नष्ट करण्याचा विचार करत असाल, जर आपली सहानुभूती जिहाद्यांसोबत असेल, तर तुम्ही आमच्या देशात घुसू शकणार नाहीत. आम्हाला तुमची आवश्यकता नाही. महत्वाचे म्हणजे, जर ज्यो बायडेन राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकले, तर आपण देश सोडून जाऊ, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी 2020 मध्ये आक रॅलीदरम्यान म्हटले होते. 

ट्रम्प यांनी 2017 मध्ये केले होते ट्रॅव्हल बॅन -
डोनाल्ड ट्रम्प यांनी 2017 मध्ये ट्रॅव्हल बॅन केले होते. तेव्हा अमेरिकेने लिबिया, इराण, सोमालिया, सीरिया, येमेन आणि अधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या सर्व देशांतील लोकांच्या प्रवेसावर बंदी घातली होती. याशिवया, उत्तर कोरिया आणि व्हेनेझुएलावरही बंदी घालण्यात आली होती. यानंतर, 2020 मध्ये म्यानमार, किर्गिस्तान, नायजेरिया, टांझानिया, सुदानवरही बंदी घालण्यात आली होती. मात्र ज्यो बायडेन यांचे सरकार आल्यानंतर, ही प्रवासी बंदी उठवण्यात आली.

Web Title: The issue of Jihad in the US elections, Trump threatened Muslim countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.