प्योंगयांग : अमेरिका, इस्रायलने इराणवर केलेल्या लष्करी कारवाईमुळे आता उत्तर कोरियाकडेही अण्वस्त्रे असण्याची नितांत आवश्यकता आहे, असे हुकूमशहा किम जाँग उन यांनी म्हटले आहे. आपल्याकडे अण्वस्त्रे नसल्याचा फायदा अन्य देश घेऊ शकतात हा धडा इराण प्रकरणातून मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
इराणसारख्या देशांना अमेरिकी कारवाईला सामोरे जावे लागत आहे. ही वेळ उद्या उत्तर कोरियावरही येऊ शकते. त्यामुळेच या देशाकडे अण्वस्त्रे असणे हा अस्तित्व टिकविण्यासाठीचा मोठा आधार असू शकतो. इराणविरोधातील लढाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा तडाखा फक्त उत्तर कोरियाच नव्हे तर अनेक देशांना बसणार आहे. नेमकी हीच स्थिती उन यांनी ओळखली आहे.
अमेरिकेच्या कारवाईची कायम आहे धास्तीउत्तर कोरिया व दक्षिण कोरियाच्या वादात अमेरिकेने कायम दक्षिण कोरियाची बाजू घेतली आहे. किम जाँग उनच्या राजवटीचा अमेरिकेने निषेध केला आहे. आपले सरकार उलथण्यास अमेरिका कारवाई करेल अशी शक्यता उन याला कायम वाटत असते.
उत्तर कोरियाने रशियाला शस्त्रास्त्र पुरवठा वाढवलायुक्रेनच्या युद्धात उत्तर कोरियाने रशियाला वाढीव प्रमाणात शस्त्रास्त्रे, दारूगोळ्याचा पुरवठा सुरू केला आहे. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने रशियाला शस्त्रास्त्रे, दारूगोळ्याचे ३३ हजार कंटेनर पाठविले आहे.
Web Summary : Kim Jong Un believes nuclear weapons are crucial for North Korea's survival after witnessing US actions against Iran. He fears similar intervention, bolstering North Korea's need for nuclear deterrence. North Korea has also increased arms supplies to Russia amid the Ukraine war.
Web Summary : किम जोंग उन का मानना है कि ईरान के खिलाफ अमेरिकी कार्रवाई के बाद उत्तर कोरिया के अस्तित्व के लिए परमाणु हथियार महत्वपूर्ण हैं। उन्हें हस्तक्षेप का डर है, जिससे उत्तर कोरिया की परमाणु प्रतिरोधक क्षमता की आवश्यकता बढ़ गई है। उत्तर कोरिया ने यूक्रेन युद्ध के बीच रूस को हथियारों की आपूर्ति भी बढ़ा दी है।