शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 09:13 IST

युक्रेनवर हल्ल्यानंतर फिनलँड आणि स्वीडन या देशांनी नाटोचे सदस्यत्व घेतले होते. रशियाचा याला विरोध होता, युक्रेनदेखील हेच करेल व नाटोचे सैन्य रशियाच्या वेशीवर येईल म्हणून रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता.

जगात सध्या दोन ठिकाणी युद्ध सुरु आहेत. भारत-पाकिस्तान युद्ध होता होता राहिले आहे. अशातच युक्रेनसोबत गेले तीन वर्षे लढणाऱ्या रशियन सैन्याने जगातील सर्वात सुखी समजल्या जाणाऱ्या देशाला वेढा घालण्यास सुरुवात केली आहे. यामुळे युरोपमध्ये खळबळ उडाली आहे. 

युक्रेनवर हल्ल्यानंतर फिनलँड आणि स्वीडन या देशांनी नाटोचे सदस्यत्व घेतले होते. रशियाचा याला विरोध होता, युक्रेनदेखील हेच करेल व नाटोचे सैन्य रशियाच्या वेशीवर येईल म्हणून रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. आता रशियाने फिनलँडकडे आपला मोर्चा वळविण्यास सुरुवात केल्याचा दावा स्वीडनने केला आहे. 

रशियाने फिनलंडच्या सीमेजवळील चार महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सैन्य आणि लष्करी उपकरणे तैनात केली आहेत. स्वीडनने उपग्रह प्रतिमांवरून रशिया मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे. यामुळे युरोपच्या चिंतेत वाढ झाली आहे. युक्रेन हल्ल्यानंतर रशियाची ही दुसरी कारवाई आहे. स्वीडनच्या राष्ट्रीय प्रसारक एसव्हीटी आणि उपग्रह कंपनी प्लॅनेट लॅब्सने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमधून हे समोर आले आहे. 

रशियाने कामेंका, पेट्रोझावोड्स्क, सेवेरोमोर्स्क-२ आणि ओलेन्या या चार ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सैन्याची तैनाती केली आहे. धक्कादायक म्हणजे फेब्रुवारीपासून फिनलँडच्या सीमेपासून ३५ मैल दूर अंतरावर रशियन लष्कराचे तंबू दिसत आहेत. सध्या तिथे २००० पेक्षा जास्त सैनिक असून तिथे शस्त्रास्त्रे तैनातीचे काम सुरु असल्याचे दिसत असल्याचे स्वीडनने म्हटले आहे. तर पेट्रोझावोड्स्कमध्ये तीन मोठे लष्करी गोदाम बांधण्यात आले आहेत, यात प्रत्येकी ५० चिलखती वाहने मावू शकतात. सेव्हेरोमोर्स्क-२ येथे मोठ्या संख्येने हेलिकॉप्टरच्या हालचाली होत आहेत. तर युक्रेनवर हल्ल्याची सुरुवात केलेल्या ओलेन्यामध्ये देखील सैन्याच्या हालचाली वाढू लागल्या असल्याचे यात म्हटले आहे.  फिनलंड एप्रिल २०२३ मध्ये आणि स्वीडन मार्च २०२४ मध्ये नाटोमध्ये सामील झाले होते.

टॅग्स :russiaरशियाfinlandफिनलंडwarयुद्ध