शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

तुम्ही खोटारडे अन् इतिहासातील सर्वांत वाईट राष्ट्राध्यक्ष: बायडेन- ट्रम्प यांच्यात ‘तू-तू, मैं-मैं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 07:49 IST

अमेरिकन अध्यक्ष निवडणुकीच्या पहिल्या डिबेटमध्ये ट्रम्प यांची बाजी

नितीन राेंघे

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमधील पहिली डिबेट भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी ६:३० वाजता पार पडली. साऱ्या जगाचे लक्ष लागलेल्या या डिबेटमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एकमेकांना खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला. तरीही यात ट्रम्प यांनी बाजी मारल्याचे दिसून आले.

अटलांटा या जॉर्जिया राज्यात झालेली ही डिबेट दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची होती. कारण जॉर्जिया हे यावर्षीच्या निवडणुकीत स्विंग स्टेट म्हणजेच कुठल्याही बाजूला वळू शकणारे राज्य आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमाने हे राज्य आपल्या बाजूला वळवून घेण्यासाठी दोघेही नेते भरपूर प्रयत्न करत होते. 

९० मिनिटांच्या चर्चेत दोघांनी वैयक्तिक हल्ले केले. बायडेन यांनी ट्रम्प यांना मूर्ख आणि पराभूत म्हटले. या डिबेटमध्ये इस्रायल - हमास आणि रशिया - युक्रेन युद्ध यावर ट्रम्प यांनी बायडेन यांना घेरले. ट्रम्प यांनी बायडेन यांना अनेक वेळा कोंडीत धरले. जी बाब आज अमेरिकेतील तमाम डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांना आणि अमेरिकन जनतेला खटकली असेल, ती म्हणजे, बायडेन यांनी जो संथपणा आणि विसरभोळेपणा या डिबेटमध्ये दाखवला, तो साहजिकच सर्वांच्या काळजीत भर घालणारा आहे. 

बायडेन अन् ट्रम्प यांच्यात अशी झाली ‘तू-तू, मैं-मैं’

माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी वयाने लहान असल्यामुळे माझ्यावर टीका झाली. आता म्हातारपणामुळे लोक तक्रार करतात. ट्रम्प माझ्यापेक्षा फक्त ३ वर्षांनी लहान आहेत. तुम्ही माझे कर्तृत्व पाहावे. मी राष्ट्रपती झालो, तेव्हा परिस्थिती काय होती? ट्रम्प माझ्यासाठी काय सोडून गेले होते? नोकऱ्या नव्हत्या, बेरोजगारी १५ टक्क्यांनी वाढली होती. हे भयावह होते. त्यामुळे आम्हाला गोष्टी पुन्हा रुळावर आणायच्या होत्या. आम्ही १५ हजार नवीन रोजगार निर्माण केले. मी काही चुकीचे बोललो नाही. ट्रम्प यांच्यावर तीन खटले चालू आहेत. पत्नी गर्भवती होती, तेव्हा ट्रम्प पोर्न स्टारबरोबर संबंधात होते.   - जो बायडेन, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका

मी वयाशी संबंधित दोन चाचण्या केल्या आहेत. बायडेन यांची एकही चाचणी झाली नाही. मी दरवर्षी शारीरिक परीक्षा देतो. मी दोन गोल्फ चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत. ते करण्यासाठी बॉलला दूरवर मारण्याची ताकद तुमच्यात असायला हवी. पण बायडेन यांना ५० यार्ड्सवरही चेंडू मारता येत नाही. कर कमी केल्याने जगातील अनेक अर्थव्यवस्था सुधारल्या आहेत. मी अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी कर सवलत दिली होती. अमेरिकेचे कर्जही कमी होत होते. मी अमेरिकेला एक यशस्वी देश बनवणार. बायडेन यांच्या मुलाने गंभीर  गुन्हे केले आहेत. - डोनाल्ड ट्रम्प, माजी राष्ट्राध्यक्ष, अमेरिका

अध्यक्षीय निवडणुकीत मोठी उलथापालथ?ही पहिलीच डिबेट असताना या डिबेटमध्ये बायडेन यांना प्रचंड उत्साह दाखवणे गरजेचे होते. याउलट ट्रम्प यांनी डिबेटमध्ये जो उत्साह दाखवला स्वतःचा माइक म्यूट असतानासुद्धा बायडेनच्या भाषणात अडथळे आणले आणि स्वतःकडे आलेले प्रश्न ज्या शिताफीने परतावून लावले, त्याने आजच्या डिबेटमध्ये ट्रम्प हे बायडेन यांच्यापेक्षा नक्कीच वरचढ ठरले.  अध्यक्षीय निवडणुकीत उलथापालथ व्हायची शक्यता नाकारता येत नाही.  यानंतरची पुढची डिबेट १२ सप्टेंबरला होऊ घातली आहे आणि त्यानंतर कदाचित उपाध्यक्ष उमेदवारांची एक डिबेट होईल.

(लेखक अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेचे अभ्यासक आहेत.)

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पJoe Bidenज्यो बायडन