शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

‘होर्मुझ’साठी भीषण युद्धाची नांदी! अमेरिकेचा इशारा; इराणचा पलटवार, इस्रायलवर क्षेपणास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 05:53 IST

आमच्याकडे युद्धासाठी भरपूर पैसा आहे, असे अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी म्हटले असून धमक्यांना थेट मैदानात उत्तर देऊ असे इराणने म्हटले आहे.

दुबई : इराणने ४८ तासांत होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग पूर्णपणे खुला करावा अन्यथा त्यांच्या वीजप्रकल्पांचा पूर्ण नाश करू, अशी धमकी शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली. या धमकीवर उत्तर देत, आमच्यावर कोणताही हल्ला झाल्यास अमेरिका व इस्रायलच्या ऊर्जा व पायाभूत सुविधांवर प्रतिहल्ला करू, असा इराणने रविवारी इशारा दिला.  यामुळे परिस्थिती अधिक धोकादायक वळणावर गेली आहे. ट्रम्प यांच्या इशाऱ्यानुसार इराणमधील बुशेहर अणुऊर्जा प्रकल्प किंवा तेहरानजवळील दामावंद वायुप्रकल्प हे अमेरिकेचे लक्ष्य असू शकतात. आमच्याकडे युद्धासाठी भरपूर पैसा आहे, असे अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी म्हटले असून धमक्यांना थेट मैदानात उत्तर देऊ असे इराणने म्हटले आहे.

रविवारी सकाळी दक्षिण इस्रायलमधील एका अणुसंशोधन केंद्राजवळील डिमोना आणि अराड या दोन शहरांवर इराणने क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यात १२५ अधिकजण जखमी झाले आणि इमारतींचे मोठे नुकसान झाले. हे हल्ले इतके जबर होते की, या दोन्ही शहरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

नतांझवरील हल्ल्यावर इस्रायलचा नकार

इराणच्या नतांझ या अणुकेंद्रावर शनिवारी हल्ला झाला; मात्र हा हल्ला आपण केला नाही, असे स्पष्टीकरण इस्रायलने दिले आहे. या अणुकेंद्रातून गळती किंवा किरणोत्सर्ग झाला नाही, असे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने म्हटले आहे. 

हिजबुल्लाहचा उत्तर इस्रायलवर हल्ला

लेबनॉनमधील इराणसमर्थक हिजबुल्ला या बंडखोर संघटनेने रविवारी उत्तर इस्रायलमधील मिसगाव आम येथे हल्ला केला. असून, त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हिजबुल्लाहने सुरू झालेल्या संघर्षानंतर इस्रायलवर हल्ले सुरू केले आहेत.

सौदी अरेबियाने क्षेपणास्त्रे, ड्रोन पाडले

इराणने रविवारी पहाटे राजधानी रियाधच्या दिशेने डागण्यात आलेल्या तीन क्षेपणास्त्रांपैकी एक हवेतच निष्प्रभ करण्यात आले, तर उर्वरित दोन निर्जन भागात पडली. याशिवाय पूर्वेकडील भागाकडे येणारी सहा ड्रोनही पाडली. तसेच शारजाहपासून १५ समुद्री मैल अंतरावर एका मालवाहू जहाजाजवळ प्रोजेक्टाइल पडून स्फोट झाला. या जहाजावरील कर्मचारी सुरक्षित आहेत.

रुग्णांचे स्थलांतर

इराणच्या अँडिमेशक शहरातील इमाम अली रुग्णालयावर हवाई हल्ल्यानंतर मोठे नुकसान झाले असून, रुग्णांना अन्य शहरांत हलवण्यात आले. शहरातील एकमेव रुग्णालयावर हल्ला झाल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.

कतार किनाऱ्याजवळ हेलिकॉप्टर दुर्घटना; ६ ठार

कतारच्या अंतर्गत मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी एक हेलिकॉप्टर कोसळून सहाजणांचा मृत्यू झाला, तर एकजण बेपत्ता आहे. संरक्षण मंत्रालयाने या अपघातामागे तांत्रिक बिघाड कारणीभूत असल्याचे सांगितले. मृतांची ओळख किंवा ते नागरी की लष्करी होते, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

श्रीलंकेत इंधनदरात २५ टक्के वाढ

जागतिक स्तरावर वाढलेल्या तेलकिमतींमुळे श्रीलंकेच्या सरकारने इंधनदरात सुमारे २५ टक्क्यांनी वाढ केली आहे.  गेल्या दोन आठवड्यांतील ही दुसरी वाढ असून, युद्ध सुरू झाल्यापासून इंधनदर एकूण एक-तृतीयांशाने वाढले आहेत. इंधनटंचाईमुळे देशात कडक रेशनिंग, आठवड्यातील एक दिवस शाळा-कार्यालये बंद ठेवण्याचे निर्णय घेतले आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : US warns Iran, Iran retaliates; Missile attack on Israel.

Web Summary : US threatens Iran over Hormuz Strait; Iran vows retaliation against US and Israel. Missile attack hits Israel, injuring many. Other events include attacks in northern Israel, missile interceptions in Saudi Arabia, a hospital bombing in Iran, a helicopter crash in Qatar, and fuel price hikes in Sri Lanka.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरAmericaअमेरिकाIranइराणIsraelइस्रायलQatarकतारDubaiदुबई