शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
2
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
3
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
4
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
5
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
6
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
7
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
8
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
9
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
10
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा
11
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी!
12
'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
13
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
14
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
15
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
16
रियल इस्टेटचा 'खिलाडी' बनला अक्षय कुमार, २ अपार्टमेंटमधून केलेली बंपर कमाई; आता कोणाला कोट्यवधींना विकलं ऑफिस?
17
"हे आज धर्म, जात शिकवायला आलेत", 'फॅण्ड्री'मधल्या शालूने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
18
कोण होणार ख्रिस्ती धर्मीयांचा पुढचा पोप? ही पाच नावं शर्यतीत आघाडीवर
19
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
20
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट

गर्भाशयातील बाळ हसतं आणि नाराजही होतं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 12:30 IST

गर्भातील मुलांच्या हावभावांचा प्रथमच सखोल अभ्यास

लंडन : आईच्या गर्भात असलेल्या मुलाला चवीचे ज्ञान असते. गरोदर असलेल्या आईच्या खाण्या-पिण्याच्या सवयीनुसार गर्भातील मुलातही चवीचे ज्ञान विकसित होते. गर्भातील मुलांच्या हावभावांचा प्रथमच सखोल अभ्यास करण्यात आला आहे. आईने कडू गोष्ट खाल्ली असेल तर गर्भातील मूल रडका चेहरा करते, असे ब्रिटनमध्ये झालेल्या या संशोधनात आढळून आले. 

या संशोधनात ३२ ते ३६ आठवड्यांच्या गर्भवती असलेल्या १०० महिलांच्या गर्भातील मुलांच्या प्रतिक्रियांचा अभ्यास करण्यात आला. डरहॅम विद्यापीठातील संशोधकांनी ३५ महिलांना कोबीची पावडर करून त्याच्या कॅप्सूल दिल्या. ३५ महिलांना गाजराच्या पावडरीच्या कॅप्सूल दिल्या, तर ३० महिलांना काहीही देण्यात आले नाही.  

गाजराची कॅप्सूल खाणाऱ्या महिलांच्या गर्भातील मुलांच्या चेहऱ्यावर हसरे भाव दिसले. ज्यांनी कोबीच्या पावडरीची कॅप्सूल खाल्ली त्या महिलांच्या गर्भातील मुलांच्या चेहऱ्यावर रडके भाव दिसून आले. मुलांच्या चेहऱ्यावरील हे सारे हावभाव अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने टिपण्यात आले.

कोबीची कॅप्सूल खाणाऱ्यांपैकी बहुतांश महिलांच्या गर्भातील मुलांना तो स्वाद जाणवल्यानंतर त्यांनी रडका चेहरा केला.गाजराची कॅप्सुल घेतलेल्या महिलांच्या गर्भातील मुलांना ती चव आवडली होती. ज्या महिलांनी काहीही खाल्ले नव्हते त्यांच्या गर्भातील मुलांच्या चेहऱ्यावर कोणतीही खास प्रतिक्रिया उमटलेली नव्हती.

ब्रिटनच्या संशोधनातील महत्त्वाचा निष्कर्ष

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चेहऱ्यावरील हावभाव टिपण्यात आले. जन्माला आलेल्या एका अर्भकाला २००१ साली केलेल्या प्रयोगांत गाजराची चव आवडली होती. त्याला अन्य पदार्थांची चव फारशी आवडत नव्हती. गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत महिलेच्या गर्भातील मुलाच्या हालचाली त्या मातेला जाणवतात असे संशोधकांनी म्हटले आहे.

टॅग्स :Babys Day Outबेबीज डे आऊटhospitalहॉस्पिटलResearchसंशोधन