शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
4
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
5
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
6
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
7
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
8
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
9
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
10
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
11
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
12
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
13
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
14
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
15
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
16
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
17
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
18
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
19
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
20
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
Daily Top 2Weekly Top 5

थायलंडच्या 'मातृतुल्य' पूर्व महाराणी सिरिकिट यांचे निधन, दीर्घकाळ आजाराशी दिली झुंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 11:30 IST

Thailand Queen Sirikit dies: महाराणी सिरिकिट यांनी राजा अदुल्यादेज यांच्याशी ६६ वर्षे संसार केला.

Thailand Queen Sirikit dies: थायलंडची माजी राणी सिरिकिट यांचे वयाच्या ९३व्या वर्षी निधन झाले. सध्याचे राजा वजिरालोंगकोर्न यांच्या त्या आई होत्या, तर थायलंडमध्ये सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या राजा भूमिबोल अदुल्यादेज यांच्या त्या पत्नी होत्या. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राणी सिरिकिट यांनी राजा अदुल्यादेज यांच्याशी ६६ वर्षे संसार केला, जो एक मैलाचा दगड मानला जातो. या दीर्घ वैवाहिक जीवनात त्यांनी एका समर्पित पत्नीची भूमिका चोख बजावली. त्याचसोबत थायलंड जनतेसाठी एक मजबूत आणि दयाळू मातृवत्सल प्रतिमाही जपली.

राणी सिरिकिटने फॅशन जगतातही आपले स्थान निर्माण केले होते. त्यांची फॅशनची शैली केवळ थायलंडमध्येच नव्हे तर जगभरात चर्चिली गेली. अनेक पाश्चात्य मासिकांनी मुखपृष्ठावर त्यांचा फोटो वापरला होता. तसेच, काहींनी त्यांची तुलना अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी जॅकी केनेडी यांच्याशी केली. त्यादेखील आपल्या फॅशन शैलीसाठी ओळखल्या जात होत्या.

राणी सिरिकिट यांना कोणता आजार होता?

राजवाड्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शुक्रवारी संपूर्ण दिवस महाराणीची प्रकृती खालावली होती. रात्री ९ वाजून २१ वाजता त्यांचे निधन झाले. त्या ९३ वर्षांच्या होत्या आणि चुलालोंगकोर्न रुग्णालयात उपचार घेत होत्या, परंतु त्यांचे प्राण वाचवणे शक्य झाले नाही. निवेदनात असेही म्हटले आहे की राणी सिरिकिट २०१९ पासून रुग्णालयात दाखल होत्या आणि विविध आजारांनी ग्रस्त होत्या. या महिन्यात त्यांना रक्तसंसर्ग देखील झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली. महाराणी सिरिकिट यांच्या निधनानंतर राजा वजिरालोंगकोर्न यांनी राजघराण्यातील सदस्यांना वर्षभराचा शोक कालावधी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

कोण होत्या राणी सिरिकिट?

राणी सिरिकिट यांचा जन्म १९३२ मध्ये झाला. त्याच वर्षी थायलंडने निरंकुश राजेशाहीतून संवैधानिक राजेशाहीत प्रवेश केला होता. सिरिकिट किटियाकर या थायलंडच्या फ्रान्समधील राजदूताची मुलगी होत्या. त्यांचे शिक्षण पॅरिसमध्ये झाले. तिथेच त्यांची भेट राजा भूमिबोल अदुल्यादेजशी झाली. त्यानंतर त्यांचे लग्न झाले. १९५६ मध्ये जेव्हा राजा भूमिबोलने बौद्ध भिक्षू म्हणून शिक्षण घेण्यासाठी मंदिरात दोन आठवडे घालवले, तेव्हा सिरिकिट यांनी तात्पुरत्या रीजेंट म्हणून काम केले होते.

देशभरात शोक

थायलंडचे लोक त्यांच्या मातृतुल्य महाराणी सिरिकिट यांच्या निधनाने शोक व्यक्त करत आहेत. एक राजेशाही व्यक्तिमत्व असूनही त्यांच्या प्रभावाने देशाच्या आधुनिक राजेशाहीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. २०१२ मध्ये स्ट्रोक आल्यापासून त्या सार्वजनिक जीवनातून दूर राहिल्या होत्या, परंतु थाई लोकांनी त्यांना कधीही अंतर दिले नाही.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Thailand's 'Motherly' Former Queen Sirikit Passes Away After Long Illness

Web Summary : Thailand's former Queen Sirikit, wife of King Bhumibol Adulyadej, died at 93. Revered for her dedication and fashion sense, she battled illness since 2019. The nation mourns her loss, remembering her influence on the monarchy.
टॅग्स :ThailandथायलंडDeathमृत्यू