शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Texas School Firing: नियतीचा क्रूर खेळ; शाळेच्या बक्षीस समारंभातील आई-मुलाची भेट ठरली शेवटची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 11:03 IST

Texas School Firing: अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एका शाळेमध्ये मोठी घटना घडली. भीषण गोळीबारात १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी जखमी झाले.

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एका शाळेमध्ये मोठी घटना घडली. भीषण गोळीबारात १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी जखमी झाले. या गोळीबारात तीन शिक्षकांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. टेक्सासच्या राज्यपालांनीदेखील याला दुजोरा दिला. दरम्यान, या घटनेत नियतीचा क्रूर खेळही दिसून आला. शाळेच्या बक्षीस समारंभात झालेली आई आणि मुलाची भेट ही अखेरची ठरली. या घटनेत १० वर्षाच्या झेविअर लोपेझ या चिमुरड्याचा मृत्यू झाला.

टेक्सासमध्ये एका शाळेत झालेल्या गोळीबाराच्या घटनेत १० वर्षीय झेविअर लोपेझ याचा मृत्यू झाल्याची माहिती एबीसी न्यूजनं त्याच्या कुटुंबीयांच्या हवाल्यानं दिली आहे. झेविअर हा चौथ्या ग्रेडमध्ये शिक्षण घेत होता. या गोळीबाराच्या काही तासांपूर्वीच झेविअर आणि त्याच्या आईची एका बक्षीस समारंभात भेट झाली होती. परंतु ही त्यांची अखेरची भेट ठरेल आणि त्या त्याला अखेरचं पाहतील असं बिलकूल वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया झेविअरच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली.१८ वर्षीय तरुणाकडून गोळीबारएका १८ वर्षीय तरुणाने हा गोळीबार केला. त्यानंतर त्यानं स्वत:वरही गोळी झाडली. दुपारच्यावेळेस ही घटना घडल्याची माहिती समोर आली. पोलिसांना माहिती मिळताच तातडीने फोर्स तिथे पाठविण्यात आली. परंतु तोवर उशिर झाला होता. २०१२ मध्ये सँडी हुक प्राथमिक विद्यालयात देखील असाच गोळीबार झाला होता. यामध्ये २० मुलांचा मृत्यू झाला होता. याच्यासारखीच परंतु त्यापेक्षा जास्त भयानक असा हा हल्ला असल्याचं टेक्सासचे राज्यपाल ग्रेग अॅबॉट यांनी सांगितलं. आरोपीने दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या ग्रेडमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर गोळीबार केला.

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारीJoe Bidenज्यो बायडन