टेक्सास प्रांतातील वादळ राष्ट्रीय संकट जाहीर

By Admin | Updated: May 30, 2015 23:39 IST2015-05-30T23:39:08+5:302015-05-30T23:39:08+5:30

गेल्या दोन दिवसांत टेक्सास प्रांतात आलेल्या भयंकर वादळाला राष्ट्रपती बराक ओबामा यांनी राष्ट्रीय संकट म्हणून जाहीर केले आहे.

The Texas Regional Storms Announced the National Crisis | टेक्सास प्रांतातील वादळ राष्ट्रीय संकट जाहीर

टेक्सास प्रांतातील वादळ राष्ट्रीय संकट जाहीर

वॉशिंग्टन : गेल्या दोन दिवसांत टेक्सास प्रांतात आलेल्या भयंकर वादळाला राष्ट्रपती बराक ओबामा यांनी राष्ट्रीय संकट म्हणून जाहीर केले आहे. या वादळाने २१ जणांचे प्राण घेतले व नद्यांना फार मोठे पूर आले. वादळानंतर काही भागात १७.८ सेंटिमीटर पाऊस कोसळला.
७० परगणे संकटग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. पावसात अडकलेल्या लोकांना पिण्याचे पाणी व अन्न पुरविण्यात आले. अवकाळी पावसामुळे पूर आल्याचे राष्ट्रीय हवामान खात्याने सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: The Texas Regional Storms Announced the National Crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.