शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांनी मुलीला ठार केलं, पत्नीवर बलात्कार केला- जोशुआ बॉयले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 16:27 IST

तालिबानशी संबंधीत हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांनी कॅनडाच्या एका नागरिकाचं अपहरण करून त्याच्या मुलीला ठार केल्याची आणि त्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

टोरँटो- तालिबानशी संबंधीत हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांनी कॅनडाच्या एका नागरिकाचं अपहरण करून त्याच्या मुलीला ठार केल्याची आणि त्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जोशुआ बॉयले असं या कॅनडाच्या नागरिकाचं नाव आहे. जोशुआ बॉयले हा त्याच्या पत्नी आणि तीन मुलांसह पाच वर्ष दहशतवाद्यांच्या कैदेत होते. पाच वर्षानंतर या कैद्यांच्या तावडीतून सुटल्यावर त्यांनी ही धक्कादायक माहिती दिली. त्यांना हक्कानी नेटवर्कच्या अतिरेक्यांनी पकडलं तेव्हा त्याची पत्नी कॅटलान कोलमन गर्भवती होती. त्यांच्या या चौथ्या मुलाबद्दल कुणालाही माहिती नव्हती. त्याच्या पत्नीवर एका सुरक्षा रक्षकाने बलात्कार केला. त्याला त्याचे सहकारी आणि मालक उत्तेजन देत होता, असं त्यांनी सांगितलं.अफगाणिस्तान- तालिबानच्या नियंत्रण क्षेत्रात कोणतीही एनजीओ पोहचू शकली नाही. तिथे सरकारी मदतही पोहचत नव्हती, अशा गावात बोयले २०१२ मध्ये गेले होते. त्यावेळी त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. पाच वर्षानंतर पाकिस्तानच्या जवानांनी त्यांची सुटका केली होती. 212मध्ये अफगाणिस्तानमध्ये एका यात्रेदरम्यान या कुटुंबाचं अपहरण झालं होतं.

नेमकं प्रकरण काय ?पाकिस्ताननं अफगान तालिबानशी संबंधित असलेली दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कच्या ताब्यातून अमेरिकी- कॅनेडियन कुटुंबाला सुरक्षित वाचवण्यासाठी मदत केली. दहशतवादाच्या मुद्द्यावर अमेरिकेच्या दबावाखाली असल्यानंच पाकिस्ताननं ही कारवाई केल्याची चर्चा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी अमेरिकी नागरिक व त्यांचे कॅनेडियन पती यांच्या सुरक्षितरीत्या सुटका होणार असल्याचं जाहीर केलं होतं. दोघांनाही 2012पासून हक्कानी नेटवर्कनं ओलीस ठेवलं होतं. या दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कला अमेरिकेनं आयएसआयची सहाय्यक संघटना म्हणून संबोधित केलं होतं. पाकिस्तान सरकारसोबत मिळून आम्ही बॉयले-कोलमॅन यांची सुटका सुनिश्चित केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं होतं. तसेच ट्रम्प यांनी पाकिस्तानचे आभारही मानले आहेत. परंतु ट्रम्प यांनी याबाबत सविस्तर माहिती देण्यास नकार दिला. 

टॅग्स :terroristदहशतवादीWomenमहिलाRapeबलात्कारCrimeगुन्हा