शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

16 जणांना मारणारा दहशतवादी स्फोटके तयार करताना चक्क हसत होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 11:48 IST

स्पॅनिश माध्यमांनी बॉम्ब तयार करणाऱ्या दहशतवाद्याचे फोटो प्रसिद्ध केले आहे.

बार्सिलोना- गेल्या वर्षी बार्सिलोनामध्ये एका रिसॉर्टजवळ हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या हल्ल्यामध्ये 16 लोकांचे प्राण गेले होते. या दहशतवादी हल्ल्यामुळे स्पेनबरोबर संपूर्ण युरोप हादरला होता. स्पॅनिश माध्यमांनी बॉम्ब तयार करणाऱ्या दहशतवाद्याचे फोटो प्रसिद्ध केले असून त्यामध्ये तो कॅमेऱ्यात पाहून चक्क हसताना दिसत आहे.

एका फोटोमध्ये दहशतवाद्याने स्वतःच्या कंबरेभोवती स्फोटके गुंडाळली असून तो हसतहसत आकाशाकडे बोट दाखवत आहे तर दुसऱ्या छायाचित्रामध्ये दोन दहशतवादी कॅमेऱ्यात पाहून स्मित करत आहेत. तसेच आयफेल टॉवरकडे बोट दाखवणाऱ्या दहशतवाद्याचेही छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. स्फोटके तयार करणाऱ्या दहशतवाद्यांमध्ये एक 22 वर्षांचा युनूस अबायाकूब असून त्याने ला राम्ब्लास येथिल किनाऱ्यावरील लोकांच्या गर्दीमध्ये व्हॅन घुसवली होती.  त्यात 16 लोकांचे प्राण गेले होते. त्यानंतर त्याने एका व्यक्तीला सुऱ्याने भोसकले. 

या लोकांनी बार्सिलोनापासून 200 किलोमीटर अंतरावरील अल्कानार या गावातील घरामध्ये बसून ही स्फोटके तयार केली होती. त्या पडझड झालेल्या घरातून ही छायाचित्रे ला रेझन या स्पॅनिश वर्तमानपत्राने मिळवली आहेत. ज्या दिवशी बार्सिलोनामध्ये हल्ला करण्यात आला त्याच संध्याकाळी या घरात स्फोट घडवला गेला आणि त्याक दोन दहशतवादी ठार झाले. आयसीसने  या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. या हल्ल्याशी संबंधित 6 मोरक्कन तरुणांना पोलिसांनी कंठस्नान घातले. हे सर्व तरुण 17 ते 24 वयाचे होते.

 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादterroristदहशतवादी