शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

स्पेनमध्ये दहशतवादी हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू, इसिसनं स्वीकारली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 01:18 IST

स्पेनमधील बार्सिलोना शहरात भरधाव कार जमावामध्ये अचानक घुसल्यानं चिरडून 13 जणांचा मृत्यू असून अनेक जण जखमी झाले आहे.

बार्सिलोना, दि. 17 - स्पेनमधील बार्सिलोना शहराला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आहे. दहशतवाद्यांनी लास रॅमब्लास या गर्दीच्या रस्त्यावर भरधाव वाहनानं अनेकांना चिरडल्यानंतर अंदाधुंद गोळीबारही केला आहे. यात 13 जणांचा मृत्यू झाला असून, 100हून अधिक लोक जखमी आहेत. वाहनाच्या धडकेत अनेक जण गंभीररीत्या जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्पेन पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. इसिस या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. तर दहशतवादाविरोधात आम्ही स्पेनसोबत असल्याचं विधान इंग्लंडच्या पंतप्रधान टेरेसा मे यांनी केलं आहे. स्पेनमध्ये दुसरा होणारा संभावित हल्ला रोखण्यासाठी कॅम्ब्रिल्समध्ये पोलिसांनी गोळीबार केला. कॅम्ब्रिल्स बंदराजवळ पोलिसांना गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर पोलिसांनी लोकांना रस्त्यावर न उतरण्याचा इशारा दिला. स्पेनचे पंतप्रधान मारियानो रखॉय यांनी 'जिहादी हल्ला' असा करार दिला आहे. तत्पूर्वी युरोपिय देशात अनेकदा अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले झालेत. फ्रान्स, बेल्जियम आणि जर्मनी हे देश अशा हल्ल्यांनी हादरले आहेत. स्पेनच्या राजघराण्यानं या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. देश अतिरेक्यांच्या दहशतवादापुढे कधीही झुकणार नाही, असं विधान स्पेनच्या राजघराण्यानं केलं आहे.  

स्पेन पोलिसांच्या माहितीनुसार, दुस-या होणारा संभावित हल्ला रोखण्यासाठी कॅम्ब्रिल्समध्ये पोलिसांनी गोळीबार केला. कॅम्ब्रिल्स बंदराजवळ पोलिसांना गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर पोलिसांनी लोकांना रस्त्यावर न उतरण्याचा इशारा दिला आहे. स्पेनमध्ये झालेल्या दुस-या दहशतवादी हल्ल्यात 6 नागरिक जखमी झाले असून, एक पोलीस जखमी आहे, असं वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बार्सिलोनातील लास रॅमब्लासमध्ये पदपथावर अनेक जण उपस्थित असतानाच एक व्हॅनने काही लोकांना चिरडलं आहे. अचानक झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानं सिटी सेंटरच्या बाहेर रस्त्यावर लोकांची तारांबळ उडाली आणि रस्त्यावर लोक अस्ताव्यस्त पळत सुटले. घटनास्थळावर पोलीस दाखल झाले असून, ते परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम करत आहेत. 

स्पेनच्या सरकारी वृत्तसंस्थेने या घटनेचा एक फोटो प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये तीन जण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडल्याचे दिसत आहे.  बार्सिलोनातील लास रॅमब्लासमध्ये एका पांढऱ्या व्हॅनने पदपथावरून चालणाऱ्या काही जणांना चिरडले. ही घटना भयावह असल्याचे पोलिसांनी ट्विटरवर म्हटले आहे. यानंतर शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने लास रॅमब्लासमधील प्लाका काटालुनिया भागात न जाण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या आहेत. याशिवाय जवळचे मेट्रो आणि रेल्वे स्थानक बंद करण्याच्या सूचनादेखील करण्यात आल्या आहेत. 

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, व्हॅनने पदपथावरील लोकांना चिरडल्यानंतर त्यामधून बाहेर पडलेले दोन जण त्याच भागातील एका हॉटेलमध्ये शिरले. या दोघांकडे हत्यारे असल्याचे वृत्तदेखील रॉयटर्सने दिले आहे. 

 

टॅग्स :TerrorismदहशतवादPoliceपोलिस