दहशतवादी हल्ला उधळला
By Admin | Updated: February 11, 2015 23:51 IST2015-02-11T23:51:15+5:302015-02-11T23:51:15+5:30
आॅस्ट्रेलियन पोलिसांनी दहशतवादी हल्ला उधळून लावत दोन जणांना अटक केली आहे. सिडनीत करण्यात आलेल्या या कारवाईत

दहशतवादी हल्ला उधळला
सिडनी : आॅस्ट्रेलियन पोलिसांनी दहशतवादी हल्ला उधळून लावत दोन जणांना अटक केली आहे. सिडनीत करण्यात आलेल्या या कारवाईत आरोपींकडून इस्लामिक स्टेटचा ध्वज, सुरा व अरबी भाषेतील व्हिडिओ जप्त करण्यात आला.
आयएसकडून येत असलेले संदेश पाहता नियोजित हल्ला अटळ होता, असे न्यू साऊथ वेल्सच्या पोलीस उपायुक्त कॅथरिन बर्न यांनी सांगितले. लोकांचे शिरच्छेद करण्याचा आरोपींचा कट होता काय या प्रश्नावर बर्न म्हणाल्या की, पोलीस याबाबत अद्याप अनभिज्ञ आहेत; मात्र हा हल्ला मंगळवारी सिडनीत होणार होता एवढे नक्की. पश्चिमेकडील उपनगरात धाड टाकून पोलिसांनी ओमर अल-कुतोबी (२४) आणि मोहंमद कियाद (२५) या दोघांना अटक केली. (वृत्तसंस्था)