काबूलमध्ये लष्करी रुग्णालयावर केला दहशतवादी हल्ला
By Admin | Updated: March 8, 2017 11:47 IST2017-03-08T11:47:22+5:302017-03-08T11:47:22+5:30
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये सशस्त्र दहशतवाद्यांनी लष्करी रुग्णालयावर हल्ला केला आहे.

काबूलमध्ये लष्करी रुग्णालयावर केला दहशतवादी हल्ला
ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. 8 - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये सशस्त्र दहशतवाद्यांनी लष्करी रुग्णालयावर हल्ला केला आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली. सरदार मोहम्मद दौद खान रुग्णालयात काही दहशतवादी शिरले आहेत असे मंत्रालयाचे प्रवक्ते जनरल दौलत वझीरी यांनी सांगितले.
रुग्णालायतून बॉम्बस्फोट आणि गोळीबाराचे आवाज ऐकू येत आहेत. वझीर अकबर खान भागात दोन नागरी रुग्णालयाजवळ 400 खाटांचे लष्करी रुग्णालय आहे. या हल्ल्यामध्ये किती जण ठार झाले किंवा जखमी झाले त्याची माहिती मिळू शकलेली नाही.