शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

'दहशतवादासाठी अमेरिका जबाबदार', बिलावल भुट्टोंनी ट्रम्प सरकारवर फोडले खापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:34 IST

Terrorism in Pakistan: अमेरिकेत जाऊन बिलावल भुट्टोंनी ट्रम्प सरकारलाच दहशतवादासाठी जबाबदार धरले आहे.

Terrorism in Pakistan: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी अमेरिकेत गेलेले पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो यांनी अमेरिकेच्या धोरणांवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. पाकिस्तानमध्ये दहशतवादाच्या घटनांमध्ये वाढ होण्यास अमेरिकेची धोरणे जबाबदार असल्याची टीका भुट्टों केली. आपल्या निवेदनात त्यांनी २०२० मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या अफगाणिस्तानबाबतच्या निर्णयाकडे लक्ष वेधले.

बिलावल म्हणाले की, अमेरिकेने ज्या पद्धतीने घाईघाईने अफगाणिस्तानातून माघार घेतली आहे, त्यामुळे अफगाणिस्तानात अनेक धोकादायक शस्त्रे राहिली. बिलावलचा दावा आहे की, ही शस्त्रे आता दहशतवादी गटांच्या हाती लागली असून, दहशतवादी ही शस्त्रे पाकिस्तानविरुद्ध वापरत आहेत.

बिलावल भुट्टो यांचे हे विधान पुन्हा एकदा अमेरिका आणि पाकिस्तानमधील राजनैतिक तणाव वाढवू शकते. बिलावल यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, अमेरिका आणि त्या प्रदेशाची भू-राजकीय परिस्थिती पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हान बनली आहे. दरम्यान, बिलावल भुट्टो आता दक्षिण आशियातील अमेरिकेच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक

भुट्टोंनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी अधिक प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यावर भर दिला. परंतु त्यांनी संपूर्ण प्रदेशात दहशतवादाला प्रोत्साहन देण्यात पाकिस्तानच्या भूमिकेचा मुद्दा उपस्थित केला नाही. इस्लामिक दहशतवादाला प्रोत्साहन देण्यात पाकिस्तानची भूमिका बिलावल यांनी मान्यच केली नाही. यावरुनच पाकिस्तानचा खरा चेहरा समोर येतो.

दरम्यान, अफगाणिस्तानने बिलावलच्या विधानावर अद्याप प्रतिक्रिया दिली नसली तरी, अफगाणिस्तानने भूतकाळात इस्लामाबादच्या चिथावणीखोर विधानांविरुद्ध इशारा नक्कीच दिला आहे. यामुळे आधीच कमकुवत असलेल्या द्विपक्षीय संबंधांमध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते.

अफगाणिस्तानातून अमेरिकेची माघार वादातप्रदीर्घ संघर्षानंतर अमेरिकेने ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानातून पूर्ण माघा घेण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेची ही संपूर्ण प्रक्रिया वादग्रस्त ठरली होती. अमेरिकेच्या माघारीनंतर तालिबानने काबूलवर ताबा मिळवला, ज्यामुळे अफगाण सरकार कोसळले होते. काबूल विमानतळावर स्थलांतर करताना झालेली चेंगराचेंगरी तर संपूर्ण जगाने पाहिली. याशिवाय, २६ ऑगस्ट रोजी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात १३ अमेरिकन सैनिक आणि १७० हून अधिक अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला होता.

माघारी दरम्यान, अमेरिकेने २० वर्षांत अफगाण सैन्याला दिलेल्या ८९ अब्ज डॉलर्स किमतीच्या लष्करी उपकरणांचा मोठा भाग तिथेच सोडून दिला. यानंतर तालिबानने अफगाण सैन्याकडून सुमारे ६,५०,००० शस्त्रे हस्तगत केली, ज्यात ३,५०,००० M4/M16 रायफल, ६५,००० मशीन गन आणि २५,००० ग्रेनेड लॉन्चरचा समावेश होता. यामुळे संपूर्ण प्रदेशात अजूनही अस्थिरता आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAmericaअमेरिकाTerrorismदहशतवादAfghanistanअफगाणिस्तानDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प