‘दहशतवाद हा सडलेला अवयव’
By Admin | Updated: October 6, 2014 23:00 IST2014-10-06T23:00:28+5:302014-10-06T23:00:28+5:30
सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला यांनी दहशतवाद हा सडलेला अवयव असून तो नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर संघटित प्रयत्न हवे आहेत

‘दहशतवाद हा सडलेला अवयव’
मीना : सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला यांनी दहशतवाद हा सडलेला अवयव असून तो नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर संघटित प्रयत्न हवे आहेत, असे म्हटले. या दहशतवादाचा इस्लामशी काहीही संबंध नाही, असे अब्दुल्ला यांनी हज यात्रेकरूंना मार्गदर्शन करताना सांगितले.
राजे अब्दुल्ला यांचा हा संदेश उप पंतप्रधान व संरक्षणमंत्री राजपुत्र सलमान यांनी वाचून दाखविला. दहशतवाद हा सडलेला अवयव आहे व त्याला कापून काढण्याशिवाय दुसरा उपायच नाही, असे राजे अब्दुल्ला यांनी संदेशात म्हटले.
(वृत्तसंस्था)