काही दिवसांपूर्वी झालेल्या एका म्युझिक फेस्टीव्हलमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. या घटनेमुळे जगाला हादरविले आहे. फ्रांसचा प्रसिद्ध बँड 'लुलु वॅन ट्रॅप' ची गायिका रेबेका बेबीने भर स्टेजवर असे काही केले की सगळ्या जगाची नजर शरमेने झुकली आहे. प्रेक्षकांनी तिला अश्लिल पद्धतीने स्पर्ष केल्याने तिने स्टेजवर येताच कपडे काढत अर्धनग्न होत याचा निषेध केला आहे. तिने उचललेल्या या पावलामुळे खळबळ उडाली आहे.
'ले क्रि दे ला गौटे' नावाचा म्युझिक फेस्टीव्हल आयोजित करण्यात आला होता. यामध्ये रेबेका परफॉर्म करत होती. तिने प्रेक्षकांमध्ये जाऊन गाण्याचा निर्णय घेतला परंतू तिथे गेल्यावर दोघांनी तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. एकाने तिचा हात पकडला आणि दुसऱ्या ने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्ष केला. यामुळे संतापलेल्या गायिकेने स्टेजवर जात गाणे म्हणत असतानाच कपडे काढण्यास सुरुवात केली. लैंगिक शोषणाविरुद्ध तिने केलेल्या या धाडसाचे कौतुक होत आहे, तसेच हे कृत्य करणाऱ्या प्रेक्षकांवर टीका केली जात आहे.
रेबेका प्रेक्षकांच्या या अश्लील कृत्याला घाबरली नाही तर तिने धाडसाने स्टेजवर येत या कृत्याचा निषेध केला. रेबेकाने स्टेजवर तिचा टॉप काढला आणि न थांबता गाणे सुरू ठेवले. तसेच कार्यक्रम झाल्यानंतर तिने सोशल मीडियावर पोस्ट करून याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
'जोपर्यंत लोक चुकीच्या नजरेने पाहणे थांबवत नाहीत तोपर्यंत हे सुरुच राहिल. मी स्टेजवर परत आले आणि त्या माणसाला शांतपणे शो सोडून जाण्यास सांगितले. त्या क्षणी माझ्याकडे दोन पर्याय होते - एकतर मी शो थांबवला असता आणि प्रत्येकजण निराश झाला असता. दुसरा असा की मी त्या कृत्याला त्याच्यासाठी लाजीरवाणे करून माझ्यासाठी ताकदवान बनवू शकते, मी तेच केले', असे रेबेकाने म्हटले आहे. महोत्सवाच्या आयोजकांनीही रेबेकाला पाठिंबा दिला आणि तिने उचललेल्या पावलाचे समर्थन केले.